Monday, November 10, 2025

Prahaar Stock Market Analysis: शेअर बाजारात अखेर सुटेकचा 'निःश्वास' आयटी शेअर्सच्या जोरावर बाजाराची उसळी तरीही 'या' गोष्टींचा संभाव्य धोका कायम

Prahaar Stock Market Analysis: शेअर बाजारात अखेर सुटेकचा 'निःश्वास' आयटी शेअर्सच्या जोरावर बाजाराची उसळी तरीही 'या' गोष्टींचा संभाव्य धोका कायम

मोहित सोमण: अमेरिकन सिनेटच्या शटडाऊन बंद करण्याच्या पावलांचा व चीनने दुर्मिळ पृथ्वी वस्तूंवरील (Rare Earth Materials) काही निर्बंध काढून टाकल्याचे घोषित केल्याने आज शेअर बाजारात स्थैर्यता टिकण्यास मदत झाली आहे. त्यामुळे सेन्सेक्स ३१९.०७ अंकाने उसळत ८३५३५.३५ पातळीवर व निफ्टी ८२.०५ अंकांने उसळत २५५७४.३५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीतील सकाळची वाढ अखेरच्या सत्रात सेन्सेक्स बँक निर्देशांकात घसरण व बँक निफ्टीतील वाढीत बदलली आहे. त्यामुळे संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने अपेक्षित वाढ बँक व वित्तीय शेअर्समध्ये झाली नाही. तरीही आयटी, फार्मा, मेटल या शेअर्समध्ये झालेल्या तेजीमुळे शेअर बाजार अखेर हिरव्या रंगात बंद झाला आहे.

आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झालेली असताना व्यापक निर्देशांकातील (Nifty Broad Indices) सर्वाधिक वाढ लार्ज मिडकॅप २५० (०.३९%), मिडकॅप १०० (०.४७%), निफ्टी २०० (०.३६%), निफ्टी १०० (०.३३%), स्मॉलकॅप १५० (०.४५%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सर्वाधिक वाढ आयटी (१.६२%), फार्मा (०.९५%), मेटल (०.५५%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०.४७%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मात्र रिअल्टी (०.२४%),पीएसयु बँक (०.१४%), मिडिया (१.०४%) निर्देशांकात झाली आहे.

आज दिवसभरात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांस. भारतीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक राखल्याने आज बाजाराने तीन सत्रानंतर वापसी केली आहे. तसेच जागतिक कारणांसह डॉलरच्या तुलनेत रूपयात किरकोळ घसरण झाल्याने बाजार सपाट पातळीवर अधिक झोकला गेला आहे. अस्थिरतेच्या वातावरणात अमेरिकेतील आगामी महागाई आकडेवारी व युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीवरील अनिश्चितता यातील अनिश्चिततेच्या कालावधीत आज जागतिक कारणांनी दिलासा मिळाला आहे. परंतु शेअर बाजारात वाढ होत असताना सोने, व कच्चे तेल कमोडिटी बाजारात आज वाढ झाली आहे.भारतीय बाजार विश्लेषकांच्या मते, निफ्टीला २६००० पातळीच्या जवळ प्रतिकार आणि २५,३०० च्या आसपास आधाराचा सामना करावा लागत आहे, पुट-कॉल रेशो ०.८८ पर्यंत सुधारत आहे, जो महागाई डेटा आणि प्रमुख कॉर्पोरेट कमाईपूर्वी सावध आशावाद दर्शवितो. त्यामुळेच ही आशावादी अस्थिरता कायम राहिली आहे.

तसेच कालच्या सकारात्मक प्रतिसादानंतर युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.५०%), एस अँड पी ५०० (०.१३%) बाजारात वाढ झाली असून नासडाकमध्ये (०.२१%) मात्र घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ गिफ्ट निफ्टीसह (०.३४%), निकेयी २२५ (१.२८%), हेंगसेंग (१.५७%), तैवान वेटेड (०.७८%), कोसपी (२.९३%) निर्देशांकात झाली असून घसरण मात्र केवळ जकार्ता कंपोझिट (०.०४%), स्ट्रेट टाईम्स (०.०९%) निर्देशांकात झाली आहे.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एचबीएल इंजिनिअरिंग (१२.२१%),युनो इंडिया (७.२९%),टोरंट फार्मास्युटिकल, टोरंट फार्मास्युटिकल (६.६३%), एफ एस एन ई कॉमर्स (६.०८%), रिलायन्स पॉवर (४.८७%), भारत डायनामिक्स (४.६१%), लेटंट व्ह्यू (४.३४%), सीसीएल प्रोडक्ट (४.२२%), गार्डन रीच (४.२१%) समभागात झाली आहे.

अखेरच्या सत्रात आज सर्वाधिक घसरण टीआरआयएल (१९.९९%), जे एम फायनांशियल सर्विसेस (७.५२%), ट्रेंट (७.४३%), शिंडलर इलेक्ट्रॉनिक्स (६.२५%), एचईजी (५.५%), नावा (५.२९%), एथर एनर्जी (४.२२%), एनसीसी (३.७३%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'अमेरिकन सरकारच्या शटडाऊनचे संभाव्य निराकरण, तसेच दुसऱ्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामात अनुकूल असलेल्या एफआयआयच्या खरेदीमुळे बाजारात सकारात्मक भावना निर्माण झाल्या. अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी उत्पन्नातील वाढ हे संघराज्य सरकार पुन्हा सुरू झाल्यामुळे इक्विटीजकडे जोखीम भावना सुधारण्याचे प्रतिबिंबित करते. स्थानिक पातळीवर, मजबूत होणारे मॅक्रो इकॉनॉमिक निर्देशक दुसऱ्या तिमाहीत (H2FY26) साठी कमाईच्या अंदाजांमध्ये वाढीव सुधारणांना आधार देतील अशी अपेक्षा आहे. यामुळे सध्याचे मूल्यांकन मजबूत होते आणि वाढीव तरलता आकर्षित होण्याची शक्यता आहे. क्षेत्रीयदृष्ट्या, आयटी निर्देशांकाने मागणी स्थिरीकरणाच्या अपेक्षांमुळे चांगली कामगिरी केली.'

आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सतत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FII) विक्रीमुळे डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा भरून निघाला आणि त्यामुळे चलनाचे सत्र मंदावले. RBI च्या ८८.७५-८८.९० झोनच्या जवळील हस्तक्षेपामुळे घसरणीला आणखी आळा बसला, ज्यामुळे रुपयाची हालचाल एका मर्यादित मर्यादेत राहिली. बाजारातील सहभागी आता या आठवड्यात अमेरिका आणि भारताकडून येणाऱ्या प्रमुख सीपीआय डेटा रिलीजची वाट पाहत आहेत, जे अल्पकालीन दिशा दाखवतील अशी अपेक्षा आहे. रुपया एका लहान परंतु अस्थिर बँडमध्ये राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये व्यापार श्रेणी ८८.४५-८८.९० दरम्यान दिसून येईल.'

Comments
Add Comment