Monday, November 10, 2025

Lenskart Share Listing: लेन्सकार्ट शेअरचे निराशाजनक लिस्टिंग ! 'होत्याचे नव्हते' झाले हाती आले धोपटणे?

Lenskart Share Listing: लेन्सकार्ट शेअरचे निराशाजनक लिस्टिंग ! 'होत्याचे नव्हते' झाले हाती आले धोपटणे?

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात लेन्सकार्ट लिमिटेड (Lenskart IPO Limited) हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी निराशेची ठरली आहे. कंपनीचा शेअर आज ७ रूपये घसरणीसह बाजारात सूचीबद्ध झाला आहे. ४०२ रूपयांच्या प्रति शेअर या प्राईज बँडच्या निश्चित किंमतीच्या तुलनेत ३९५ रूपये प्रति शेअरसह बाजारात सूचीबद्ध झाला आहे. मात्र थोड्या काळात कंपनीच्या शेअरने किरकोळ २% रिकव्हरी केली आहे. मात्र अपेक्षित किंमतीच्या लिस्टिंग साध्य करण्यासाठी कंपनीला अपयश आले आहे. अनेक तज्ञांच्या मते ७०००० कोटींच्या या आयपीओला अपेक्षेपेक्षा अधिक मागणी निर्माण झाली असून मूल्यांकन कंपनीच्या आर्थिक ताकदीच्या तुलनेत खूप जास्त आहे असे म्हटले होते. त्यानंतर हळूहळू १० रुपयांच्या पटीत लेन्सकार्ट ग्रे मार्केट बाजार किंमतीत घसरण होत होती आणि अखेर आज शेअरमध्ये घसरण झाली. दुपारी १२ वाजता कंपनीचा शेअर १.६८% उसळत ४०८.७५ रुपयांवर व्यवहार करत आहे.

७२७८ कोटींच्या बुक व्हॅल्यू असलेल्या आयपीओला २८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB) ४५ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते. तर किरकोळ व विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडूनही पूर्ण सबस्क्रिप्शन भरले होते. अस्थिरतेच्या काळात शेअरला आणखी फटका बसला आहे. बाजार विश्लेषकांच्या मते बाजार तज्ञ अंबरीश बालिगा यांनी या शेअरची किंमत जास्त असल्याचे म्हटले. 'लेन्स्कार्टची किंमत जास्त आहे आणि तो जास्त आहे त्यामुळे अल्पावधीत काहीही शक्य आहे  तो प्रीमियमवर उघडू शकतो कारण त्याचे शेअर्स जास्त आहेत, विशेषतः प्रतिष्ठेचा धोका, परंतु तो टिकवून ठेवणे कठीण असू शकते. जर तो सवलतीत उघडला तर आपल्याला काही प्रमाणात विक्रीची भीती वाटू शकते.'

बाजार तज्ञ अंबरीश बालिगा यांनी या शेअरची किंमत जास्त असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.आयपीओवर बोलताना ते म्हणाले आहेत की,'लेन्स्कार्टची किंमत जास्त आहे आणि तो जास्त आहे त्यामुळे अल्पावधीत काहीही शक्य आहे तो प्रीमियमवर उघडू शकतो कारण त्याचे शेअर्स जास्त आहेत, विशेषतः प्रतिष्ठेचा धोकाही आहे परंतु तो टिकवून ठेवणे कठीण असू शकते.जर तो सवलतीत उघडला तर आपल्याला काही प्रमाणात विक्रीची भीती वाटू शकते.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >