Sunday, November 9, 2025

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सावधान !

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सावधान !

आम्ही जबाबदार नाही; सेबीचा सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली  : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या पद्धतीदेखील बदलत आहेत. दागिने, नाणी खरेदी करण्याव्यतिरिक्त आता डिजिटल गोल्डमधील गुंतवणूकही वाढत आहे. मात्र, यामध्ये फसवणुकीचा धोकाही कायम आहे. अशातच आता सेबीने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला. यामध्ये म्हटले आहे की, डिजिटल गोल्ड आणि ई-गोल्ड उत्पादने सिक्युरिटीज मार्केट फ्रेमवर्क अंतर्गत येत नाहीत. ही सेबी नियंत्रित गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड पावत्यांपासून वेगळी आहेत.

सेबीने सतर्कतेचा इशारा देत पुढे म्हटले आहे की, सध्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म डिजिटल गोल्ड किंवा ई-गोल्डमध्ये गुंतवणुकीची ऑफर देताना दिसत आहेत; परंतु नियमन नसल्यामुळे यामध्ये गुंतवणुकीचा धोका आहे. डिजिटल गोल्ड सेबीच्या नियमनाच्या कक्षेत येत नसल्याने डिजिटल गोल्ड किंवा ई-गोल्ड उत्पादनांमध्ये गुंतवणुकीदरम्यान काही गडबड झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास, सेबीकडून कोणतंही संरक्षण किंवा मदत मिळणार नाही. डिजिटल गोल्डमध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सोने खरेदी किंवा विक्री करू शकता. डिजिटल गोल्ड गुंतवणूक घरबसल्या मोबाइल अॅप सहज करता येते. सध्या याला खूप प्रोत्साहन दिले जात आहे.

Comments
Add Comment