Monday, November 10, 2025

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक बिनविरोध निवड

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या सर्वांनी उमेदवारी मागे घेतल्याने नाईक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. अशाप्रकारे अजिंक्य नाईक पुन्हा एकदा एमसीएचे अध्यक्ष बनले आहेत.

अध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, डायना एडलजी आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज दाखल केले होते मात्र या सर्वांनी उमेदवारीतून माघार घेतल्याने नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले.

आता मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन झाल्यानंतर नाईक अध्यक्ष झाले होते. नंतर आता पुन्हा एकदा त्यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. अजिंक्य नाईक हे २३ जुलै २०२४ रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. वयाच्या ३८ व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडल्याने आता इतर पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक १२ नोव्हेंबर रोजी होईल. उपाध्यक्षपदासाठी ९, सचिवपदासाठी १०, सहसचिवपदासाठी ९ आणि खजिनदारपदासाठी ८ अर्ज आले आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्यांसाठी तब्बल ४८ अर्ज दाखल झाले आहेत. पुढील काही दिवसांत या महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment