कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेतील पहिला आणि पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने ४ विकेट राखून जिंकला. यानंतर भारताने तिसरा सामना पाच विकेट राखून तर चौथा सामना ४८ धावांनी जिंकला. या लागोपाठच्या विजयांच्या जोरावर भारताने मालिका खिशात टाकली. आता भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील २५ वर्षांपासून भारताला भारतात हरवू शकलेला नाही. यामुळे भारतीय संघ आत्मविश्वासाने दक्षिण आफ्रिकेला सामोरा जाणार असे चित्र आहे.
कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या फलंदाजीदरम्यान ४.५ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाशदीप.
जाणून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०२५ वेळापत्रक
पहिली कसोटी - १४ ते १८ नोव्हेंबर - कोलकाता
दुसरी कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर - गुवाहाटी
पहिला एकदिवसीय सामना - ३० नोव्हेंबर - रांची
दुसरा एकदिवसीय सामना - ३ डिसंबर - रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना - ६ डिसेंबर - विशाखापट्टणम
पहिला टी ट्वेंटी सामना - ९ डिसेंबर - कटक
दुसरा टी ट्वेंटी सामना -११ डिसेंबर, नवं चंडिगड
तिसरा टी ट्वेंटी सामना - १४ डिसेंबर, धरमशाला
चौथा टी ट्वेंटी सामना - १७ डिसेंबर, लखनऊ
पाचवा टी ट्वेंटी सामना - १९ डिसेंबर, अहमदाबाद





