Sunday, November 9, 2025

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

मुंबई: देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल, असं आपण नेहमीच म्हणतो. मग ते सुख असो किंवा दु:ख... आणि याचा अनुभव आपल्याला जगताना येतोच... अशीच गोष्ट आहे एका जिद्दी स्त्रीची... पायाच्या अंगठ्याने धनुष्य उचलला... तोंडातून बाण सोडला... आणि तिचा निशाणा अचूक लागताच भारताचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. या १८ वर्षाच्या मुलीने दाखवून दिले की, प्रतिभेला शरीराची, परिस्थितीची किंवा मर्यादांची गरज नसून तुमच्यामध्ये धैर्य आणि जिद्ध असेल तर काहीही करु शकता येते.

ही गोष्ट आहे शीतल देवीची... जेद्दाह येथे होणाऱ्या आगामी आशिया कप स्टेज ३ साठी शीतल देवीची भारतीय एबल- बॉडी ज्युनियर संघात निवड झाली आहे. एबल-बॉडी ज्युनियर संघात समावेश होणारी ती पहिली भारतीय पॅरा तिरंदाज बनली आहे. विविध आव्हानांवर मात करत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असणाऱ्या शीतलने जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यानंतर आता तिची स्पर्धा सक्षम तिरंदाजांशी होणार आहे. हि भारतीय क्रिडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटना आहे. तिच्या या यशाने तिच्यातील अपंगत्वाचे सगळे दोष पुसून टाकले आहेत.

शितलने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकत आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये शीतलने सांगितले आहे, जेव्हा मी स्पर्धा करायला सुरुवात केली, तेव्हा माझे एक छोटेसे स्वप्न होते - एक दिवस सक्षम लोकांसोबत स्पर्धा करण्याचे. सुरुवातीला मी यशस्वी झाले नाही, पण प्रत्येक अपयशातून शिकत राहिले. आज, ते स्वप्न एक पाऊल जवळ आले आहे. आशिया कप ट्रायल्समध्ये, मी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आणि आता आशिया कपमध्ये सक्षम वर्गात भारताचे प्रतिनिधित्व करेन. स्वप्नांना वेळ लागतो. काम करा. विश्वास ठेवा. तसेच या यशाचे श्रेय तिने तिचे प्रशिक्षक गौरव शर्मा यांना दिले आहे.
 
View this post on Instagram
 

A post shared by Sheetal Devi (@sheetal_archery)

Comments
Add Comment