सिंधुदुर्ग : एका अत्यंत संतापजनक आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा परिसरात झाली आहे. येथील 'ओंकार हत्ती' नावाच्या एका एकरानटी हत्तीवर क्रूरपणे सुतळी बॉम्बने हल्ला करण्याची घटना समोर आली आहे. सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर एकटा फिरणारा हा ओंकार हत्ती तुळसाण येथील नदीत शांतपणे अंघोळ करत असताना, काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हा अमानुष हल्ला केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले आहे. वन्यजीवांवर माणसांनी केलेल्या क्रूर कृत्याचे हे ताजे उदाहरण आहे. हा व्हिडिओ अनेक प्राणीप्रेमी आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण करत आहे. हा हल्ला नक्की कधी आणि कसा घडला, याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आता वन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
प्रतिनिधी:बाजार नियामक सेबी (Security Exchange Board of India SEBI) लवकरच शॉर्ट सेलिंग (Short Selling) संबंधित नवे कडक नियम बनवू शकते. तसे संकेत सेबी अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी एका ...
बांदा येथील ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्बचा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हत्ती तुळसाण येथील नदीच्या पाण्यात शांतपणे अंघोळीचा आनंद घेत होता. याचवेळी, काही अज्ञातांनी विरुद्ध दिशेकडून त्याच्या दिशेने सुतळी बॉम्ब फेकले. बॉम्बचा मोठा आवाज आणि स्फोट होताच हत्ती भेदरून गेला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हत्ती स्फोटाच्या आवाजाने घाबरून तडक जंगलाच्या दिशेने पळ काढताना दिसत आहे. एका मुक्या प्राण्यावर झालेला हा हल्ला अतिशय संतापजनक आहे. ही संपूर्ण घटना @KhaneAnkita नावाच्या 'एक्स' काऊंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या क्रूर कृत्यावर नेटिझन्सनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने 'निच व्यक्तीला फटकून काढलं पाहिजे' अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या एका युजरने, 'मुक्या प्राण्यावर ती असे फटाके टाकू नका, हत्ती जर खवळला तर...' अशी भीती व्यक्त केली. तर, 'फेकण्यामागचं कारण काय?' असा थेट प्रश्न एका युजरने विचारला आहे. या घटनेमुळे वन्यप्राण्यांशी होणारे क्रूर वर्तन नवीन राहिलेले नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हा व्हिडिओ माणसांमधील माणुसकीचा लोप आणि क्रूरतेची वाढ दर्शवणारा ठरला आहे.





