Saturday, November 8, 2025

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी डिझाईन केले आहे. ९ कॅरेट ३६ सेंट हिरे आणि १८ कॅरेट सोने वापरून हे सफरचंद बनवण्यात आले आहे. यामुळे त्याची किंमत १० कोटी आहे. महत्त्वाचे म्हणजे या सफरचंदाची नोंद थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केली आहे.

हिरे आणि सोन्याने जडवलेले हे सफरचंद रोहित पिसाळ यांनी केले आहे. रोहित पिसाळ यांना गोल्ड मॅन म्हणून ओळखले जाते. त्यांनी हे सफरचंद अतिशय काळजीपूर्वक डिझाइन केले असून सध्या थायलंडमधील रॉयल पॅलेसमध्ये ते विक्रीसाठी ठेवले आहे.

प्रमाणपत्रानुसार, हे सफरचंद ९ कॅरेट ३६ सेंट हिऱ्यांनी जडवलेले आहे. ज्याचे वजन अंदाजे २९ ग्रॅम आहे. या सफरचंदावर असलेल्या नाजूक कामामुळे थायलंडमध्ये याची मागणी वाढली आहे. जगप्रसिद्ध वर्ल्ड इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटने देखील या सफरचंदाचे प्रमाणन केले आहे.

Comments
Add Comment