जीडीपी ६.८ पेक्षा जास्त वेगाने वाढणार - मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन

प्रतिनिधी:मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी शुक्रवारी भारतीय अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट केले आहे. जागतिक अनिश्चिततेतही भारताने केलेला खाजगी भांडवली खर्च (Capital Expenditure) मजबूत आहे असे त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढ ६.८% पेक्षा जास्त होण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी वर्तवले होते.


येथे एका कार्यक्रमात बोलताना, त्यांनी खाजगी भांडवली खर्चात सुधारणा आणि परकीय गुंतवणूक वाढल्याचे कारण देत दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारीनंतर जीडीपी वाढीमध्ये वाढ होण्याची शक्यता दर्शविली आहे तसेच त्यांनी नमूद केले की वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत गेल्या दोन वर्षांपेक्षा निव्वळ एफडीआयचा प्रवाह अर्थपूर्णपणे जास्त झाला आहे. नागेश्वरन पुढे म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२४-२५ हे खाजगी भांडवली खर्चासाठी खूप चांगले वर्ष आहे, ज्यामुळे मंदीच्या धारणांना तोंड द्यावे लागते.


नागेश्वरन म्हणाले की, आर्थिक वर्ष २४ मध्ये कमी पडलेला खाजगी भांडवली खर्च आर्थिक वर्ष २५ मध्ये जोरदारपणे वाढला आहे, ज्यामुळे गुंतवणुकीचा वेग वाढत असल्याचे दिसून येते. सीईएने उलटे शुल्क संरचना (GST) दुरुस्त करण्यासह विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी मजबूत नियामक (Regulatory) आणि कायदेशीर चौकटीचे (Law Framework) महत्त्व अधोरेखित केले.


त्यांनी सांगितले की, भारताच्या धोरणात सर्व उत्पादन ऑनशोअर करण्याऐवजी जागतिक पुरवठा साखळींमध्ये सामील होणे आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे याला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच नागेश्वरन म्हणाले आहेत की, अमेरिका-भारत टॅरिफ करार लवकरच अंतिम केला जाऊ शकतो. त्यांनी भारतातील अलीकडील वापरातील वाढ प्रामुख्याने पुरवठा-बाजूच्या विस्तारामुळे मजबूत गुंतवणूक गतीमुळे झाली आहे असे वर्णन केले. त्याच कार्यक्रमापूर्वी, सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनीही नमूद केले की भारताची शाश्वत आर्थिक ताकद आणि 'विकसित भारत' ध्येयाकडे वाटचाल त्याच्या भांडवली बाजारपेठेमुळे लक्षणीयरीत्या चालेल.


त्यांनी असेही नमूद केले की कंपन्यांनी या वर्षी प्राथमिक बाजारातून अंदाजे २ लाख कोटी रुपये उभारले आहेत, जे गुंतवणूकदारांचा मजबूत विश्वास दर्शवते. पांडे यांनी संरचनात्मक संधींवर प्रकाश टाकला, व्यवस्थापनाखालील म्युच्युअल फंड मालमत्ता (Asset Under Management AUM) जीडीपीच्या २५% पेक्षा कमी आहेत, ज्यामध्ये शहरी सहभाग अंदाजे १५% आणि ग्रामीण सहभाग ६% आहे.

Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री