Friday, November 7, 2025

दादरच्या स्टार मॉलला आग, अग्निशमनच्या पाच जवानांचा श्वास गुदमरला

दादरच्या स्टार मॉलला आग, अग्निशमनच्या पाच जवानांचा श्वास गुदमरला

मुंबई : दादर येथील स्टार मॉल शुक्रवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करुन ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणत असताना अग्निशमन दलाच्या पाच जवानांचा श्वास गुदमरला. यात एक फायर स्टेशन ऑफिसर आणि चार फायरमन आहेत. या पाच जणांना मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे अग्निशमन दलाच्या एक फायर स्टेशन ऑफिसर आणि चार फायरमन यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या पाचही जणांवर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता स्टार मॉलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या मॅकडोनल्ड्सच्या किचनमध्ये आग लागली. आगीची बातमी मिळताच अग्निशमन दल, पोलीस, १०८ ॲम्ब्युलन्स आणि स्थानिक वॉर्ड कर्मचारी (Ward Staff) घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसलीही दिरंगाई न करता आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली. जेमतेम १५ ते २० मिनिटांत अग्निशमन दलाने ही आग 'लेव्हल १' (L-1) अर्थात किरकोळ स्वरूपाची असल्याचे घोषित करून पूर्णपणे नियंत्रणात आणली. अग्निशमन दलाने वेळेत कारवाई केल्यामुळे संभाव्य मोठे संकट टळले.

Comments
Add Comment