यशोमान आपटे अन् रुमानी खरेचं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

२१ नोव्हेंबरला शुभारंभाचा प्रयोग


मराठी व्यावसायिक रंगभूमीवर सध्या उत्तमोत्तम नाटके येत आहेत, या नाटकांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. त्यात आता ‘लागली पैज?’ या नव्याकोऱ्या नाटकाची भर पडणार आहे. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून या नाटकाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला चार्मिंग बॉय, तरुणाईचा आवडता चेहरा अर्थात अभिनेता यशोमन आपटे या नाटकात प्रमुख भूमिका साकारत असून अभिनेत्री रुमानी खरे या नाटकातून व्यावसायिक नाट्य रंगभूमीवर पदार्पण करत आहे. २१ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.


प्रभात थिएटर्सने निर्मिती केलेल्या 'लागली पैज?' या नाटकाचे निर्माते ज्योती कठापूरकर व निखिल करंडे आहेत, तर ज्योती पाटील, प्रियांका बिष्ट, रूपा करोसिया आणि मनोज मोटे हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे लेखन हर्षद प्रमोद कठापूरकर यांचे असून अंकुर अरुण काकतकर दिग्दर्शित या नाटकात यशोमान आपटे, रुमानी खरे यांच्यासह सुप्रिया विनोद, शंतनू अंबाडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बऱ्याच वर्षांनंतर संदीप खरे यांनी नाटकासाठी गाणी लिहिली असून त्यांनी लिहिलेल्या गीतांना साई-पीयूष यांनी संगीत दिले आहे, तर संतोष शिदम हे सूत्रधार आहेत. लागली पैज?’ आजच्या तरुणाईच्या नात्याची गोष्ट सांगते. गीतकार संदीप खरे यांची कन्या रुमानीनं आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, या नाटकातून रुमानी खरे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे. नात्यात प्रेम आणि महत्त्वाकांक्षा ह्यांमध्ये जेव्हा एकाची निवड करण्याची वेळ येते तेव्हा निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत यावर या नाटकाचे कथानक बेतले आहे. आदित्य आणि रेवा या जोडप्यात रेवाला सतत पैज लावण्याची सवय असते. अशावेळी दोघंजण नातं टिकवून ठेवण्याची पैज लावतात, मग त्यांच्या नात्याचं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर नाटक पाहिल्यावरच मिळणार आहे.

Comments
Add Comment

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

ओटीटीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन २'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. बुधवारी झालेल्या

Saif Ali Khan : ५० व्या वर्षीही अविवाहित असलेली सैफ अली खानची बहीण सबा पटौदीचा लग्नाबद्धल मोठा खुलासा!

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif ali Khan) आणि अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) यांची मोठी बहीण सबा पटौदी (Saba Pataudi) नेहमीच

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Amitabh Bachchan : "शूट चुकवलं असतं तर माझी..."; KBC साठी सलग २४ तास काम! ८३ व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या जिद्दीला सलाम

मुंबई : वयाच्या ८३व्या वर्षीही बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा आणि शिस्त

Salman Khan : सलमान खानवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप! ‘बीइंग ह्युमन’ ज्वेलरी प्रकरणात कोर्टाचे समन्स; जाणून घ्या ३ कोटींच्या गुंतवणुकीचा वाद नेमका काय?

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण आहे ‘बीइंग ह्युमन’ (Being Human)

Ted Sarandos Meets PM Modi : Netflix ची भारतासाठी मोठी घोषणा! देश बनणार ‘ग्लोबल कंटेंट क्रिएशन हब’; टेड सारंडोस यांनी घेतली PM मोदींची भेट

नवी दिल्ली : भारतातील नेटफ्लिक्सच्या (Netflix) प्रवासाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीचे सह-मुख्य