मुंबई : मध्य रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री कल्याण आणि बदलापूर दरम्यान चार ठिकाणी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शुक्रवार रात्री १.५० ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत १ तास ३० मिनिटे इतका असेल. या ब्लॉकमुळे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार असून भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस व विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत –पनवेल–दिवा मार्गे वळविण्यात येतील: कल्याण स्थानकावर नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येईल, जेणेकरून कल्याण येथे चढणारे किंवा उतरणारे प्रवासी आपला प्रवास सुलभपणे करू शकतील.
हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैन सागर एक्सप्रेस वांगणी स्थानकावर पहाटे ३.१३ ते ३.२० वाजेपर्यंत थांबविण्यात येईल. उशिरा धावणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या तसेच सुट्टी विशेष गाड्या आवश्यकतेनुसार संचालनात्मक कारणास्तव वळविण्यात येतील. या ब्लॉक कालावधीत कल्याण आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरी सेवा उपलब्ध राहणार नाहीत.






