नाशिक: ज्वलंत हिंदुत्वाचे राज्यातले केंद्र नाशिकमध्ये आहे. या नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा हा हिंदूंचा महाकुंभ आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात फक्त हिंदू व्यावसायिकांचीच दुकानं लागली पाहिजेत. कुंभमेळ्यात मुसलमानांची दुकानं नको; अशी ठाम भूमिका मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. मुसलमान व्यापाऱ्यांची दुकानं महाकुंभ परिसरात नसावीत, असेही ते पुढे म्हणाले.
आम्ही त्यांच्या देवस्थानांवर विक्रीसाठी जात नाही, मग आमच्या धार्मिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती का ? हिंदू समाजाने सतर्क राहून कुंभमेळ्यात हिंदूंचीच दुकाने लागतील, याची काळजी घ्यावी, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. या देशात राहून जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न मानता शरियत कायदा चालवायचा विचार असेल, तर अशांना या देशात राहण्याचा अधिकार नाही; असेही मंत्री नितेश राणे यांनी सुनावले.
मंत्री नितेश राणे यांचा नाशिकमध्ये विरोधकांना सवाल नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतरच विरोधकांकडून मतबंदीचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? लोकसभा ...
भारतात राहून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यायचा आणि मतदानाच्या वेळी इस्लामचा विचार करायचा , हे कसे चालेल ? या शब्दात मंत्री नितेश राणेंनी 'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला.






