चीनचे अंतराळवीर अवकाश स्थानकात अडकले

बीजिंग : चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. चीनच्या अंतराळ स्थानकाला सूक्ष्म अंतराळ कचऱ्याची टक्कर झाल्यामुळे बुधवारी ठरलेली अंतराळवीरांची परतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. ही माहिती चायना मॅनड स्पेस एजन्सी (सीएमएसए) ने दिली आहे.


एजन्सीने सांगितले की हा निर्णय अंतराळवीरांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणि मिशनच्या यशासाठी खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे. चीन दर सहा महिन्यांनी आपल्या अंतराळ स्थानकावरील दलाची अदलाबदल करतो. गेल्या शनिवारी शेनझोउ-२० अंतराळयानाने शेनझोउ-२१ मोहिमेच्या क्रूसह कक्षेत ‘हँडओव्हर प्रक्रिया’ पूर्ण केली होती. अंतराळ स्थानकाच्या ‘चाव्या’ मंगळवारी औपचारिकपणे नव्या दलाकडे सुपूर्द करण्यात आल्या.


शेनझोउ-२० मोहिमेतील तीन अंतराळवीर — चेन डोंग, चेन झोंगरुई आणि वांग जिए — यांनी आपले सर्व नियोजित काम पूर्ण केले होते आणि बुधवारी इनर मंगोलियातील डोंगफेंग लँडिंग साइटवर उतरण्याचे नियोजन होते. मात्र, अंतराळ कचऱ्याच्या टक्करमुळे त्यांची परतीची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.


दरम्यान, चीनने अलीकडेच शेनझोउ-२१ अंतराळयानाद्वारे तीन नवीन अंतराळवीरांना सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी आपल्या कक्षीय स्थानकावर पाठवले आहे. यापूर्वी चीनने जाहीर केले होते की २०३०पर्यंत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवण्याचे लक्ष्य त्यांनी निश्चित केले आहे आणि त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. चीनच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाचे प्रवक्ते झांग जिंगबो यांनी सांगितले होते की सध्या मानवयुक्त चंद्र मोहिमेशी संबंधित सर्व संशोधन आणि विकास प्रकल्प सुरळीतपणे सुरू आहेत. लॉन्ग मार्च-१० रॉकेट, चंद्र लँडिंग सूट आणि एक्सप्लोरेशन व्हेईकल यांसारख्या प्रकल्पांवर जोरदार काम सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले — “२०३० पर्यंत चीनचा एक नागरिक चंद्रावर पाऊल ठेवेल, हा आमचा निर्धार दृढ आणि अढळ आहे.”

Comments
Add Comment

बांगलादेशमध्ये पुन्हा अस्थिरतेचे वारे ? जमात -ए- इस्लामीचा युनूस सरकारला निर्वाणीचा इशारा

ढाका : आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर देशात मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जमात -ए- इस्लामी या इस्लामिक

पिगी बँकमध्ये साठवली ५७ हजारांची चिल्लर...

वॉशिंग्टन  : आधुनिक मुलं डुकराच्या आकाराच्या भिशीत म्हणजेच ‘पिगी बँक’मध्ये नाणी साठवून बचत करण्याची सवय लावून

चीनचे अंतराळवीर अवकाश स्थानकात अडकले; स्पेस एजन्सीने दिली मोठी माहिती

बीजिंग : चीनच्या मानवी अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. चीनच्या अंतराळ स्थानकाला सूक्ष्म अंतराळ कचऱ्याची

पुढील पर्याय फक्त युद्ध असेल, अफगाणिस्तान पाकिस्तान वादावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे निर्वाणीचे वक्तव्य

पाकिस्तान: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धस्थितीवर आज तुर्कीमध्ये उच्चस्तरीय चर्चा पुन्हा सुरू

UPS Cargo Plane Crash : उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांत... विमान दुर्घटनेचा हादरवणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद!

लुईसव्हिल : अमेरिकेतील केंटकी राज्यातील लुईसव्हिल मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Louisville Muhammad Ali International Airport)

Newyork Mayor Election : ट्रम्प यांना मोठा धक्का! न्यूयॉर्कला मिळाले पहिले मुस्लिम महापौर; भारतीय वंशाच्या जोरहान ममदानी यांचा दणदणीत विजय!

वॉशिंग्टन : अमेरिकेतील (America) सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क शहराच्या महापौर पदाच्या (Mayoral Election)