संजय गांधी उद्यानातून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या प्रवेशद्वारावर घडणार वाघाचे दर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी): गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून जाणा-या बोगद्याच्या ठिकाणी सुयोग्य जागा निश्चित करून राज्य शासनाच्या वन आणि पर्यटन विभागाच्या सहकार्याने वाघाचे शिल्प मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणार आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी असा गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. सुमारे १२. २० किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरुन २५ मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील जुलै महिन्यात पार पडले. त्यामुळे टप्पा तीन मधील कामांना सुरुवात झाली आहे.




गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या या टप्पा-३ मध्ये, आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून जाणाऱ्या बोगद्यांमार्फत शहराची हरित वनक्षेत्रे व तलाव संरक्षित ठेवणारा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरामध्ये बोरीवली ते गोरेगाव दरम्यानच्या क्षेत्रामध्ये 'आनंदवन हरित पट्टा' विकसित करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. या ठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी नैसर्गिक दगडांच्या पायवाटा व त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड आणि बायो-टॉयलेट, इत्यादींचा समावेश असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments
Add Comment

राज्यात नवीन रक्तपेढी सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

रक्तपिशव्यांचे संकलन करण्यासाठी हमीपत्राची गरज मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात नवीन रक्तपेढी सुरू

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहतूक बंद

मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याची कामे

निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक संभ्रमात

परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी; शिक्षकांच्या अडचणीत वाढ मुंबई : महाराष्ट्रात १२ जिल्हा परिषद आणि १२५

भाजपच्या नगरसेवकांची सोमवारी कोकण भवनमध्ये नोंदणी

गटाऐवजी भाजप स्वतंत्रपणे नगरसेवकांची करणार नोंदणी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर

राज्यातील ‘आयटीआय’ होणार ‘स्किल डेव्हलमपेंट हब’

मंत्री मंगलप्रभात लोढा; पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्याचा समावेश मुंबई : पंतप्रधान

मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव

मुंबई : महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांची अपर मुख्य सचिव (गृह) पदी नियुक्ती केली आहे.