मुंबई (खास प्रतिनिधी): गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पांतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून जाणा-या बोगद्याच्या ठिकाणी सुयोग्य जागा निश्चित करून राज्य शासनाच्या वन आणि पर्यटन विभागाच्या सहकार्याने वाघाचे शिल्प मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी असा गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. सुमारे १२. २० किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरुन २५ मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील जुलै महिन्यात पार पडले. त्यामुळे टप्पा तीन मधील कामांना सुरुवात झाली आहे.
मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेची चार रुग्णालये सार्वजनिक खासगी सहभाग तत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर यापैकी गोवंडी ...





