Thursday, November 6, 2025

रेडिंग्टन कंपनीचा शेअर १२.५१% उसळला तर होम फर्स्ट फायनान्स कंपनीचा शेअर ९% कोसळला

रेडिंग्टन कंपनीचा शेअर १२.५१% उसळला तर होम फर्स्ट फायनान्स कंपनीचा शेअर ९% कोसळला

मोहित सोमण:रेडिंग्टन कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त वाढ झाली असून मात्र होम फर्स्ट फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त घसरण झाली आहे. दोन्ही शेअरमध्ये झालेली हालचाल प्रामुख्याने नुकत्याच तिमाही निकालांच्या आधारावर होत आहे. कालच्या निकालानुसार रेडिंग्टन कंपनीच्या शेअरमध्ये सकाळच्या सत्रात १२.५१% वाढ झाली आहे. सुरुवातीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) महसूलात प्रथमच १७% उच्चांकी वाढ झाली होती.ही वाढ १७% झाल्याने कंपनीचा महसूल २९११८ कोटींवर पोहोचला होता. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) ३२% वाढत ३८८ कोटीवर पोहोचला होता तर माहितीनुसार, कंपनीच्या भारतातील महसूलात २३% व तितकीच २३% वाढ युएई बाजारात झाली होती. त्यामुळेच आज कंपनीचा शेअर १० ते १२% पातळीवर उसळत आहे. सकाळी शेअरमध्ये १२.५१% वाढ झाल्याने कंपनीचा शेअर २८१.५५ पातळीवर पोहोचला होता. दुपारी १२.३३ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये १२.८७% वाढ झाल्याने दरपातळी प्रति शेअर २८२.४५ रूपयांवर (All time High) पोहोचली आहे. अँपल फोनची सप्लायर कंपनी म्हणून ही कंपनी ओळखली जाते.

दुसरीकडे मात्र होम फर्स्ट फायनान्स लिमिटेड कंंपनी शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ही पडझड चांगल्या निकाल प्रदर्शनानंतरही झाल्याने बाजारात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये वाढलेल्या चढउताराचा (Volatility) फटका आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बसला. आज सकाळच्या सत्रातील सुरुवातीच्या कलात शेअर ८ ते ९% पातळीवर घसरला आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ८.०४% इतकी घसरणा झाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये दुपारी १२.३८ वाजेपर्यंत ७.३३% घसरण झाल्याने शेअर ११०८.२० रूपये प्रति शेअरवर पोहोचला आहे.

खरं तर होम फर्स्ट फायनान्सचा तिमाही निकाल चांगला लागला होता. कंपनीच्या एकूण निव्वळ विक्री व नफ्यात वाढ झाली होती. माहितीनुसार, कंपनीच्या निव्वळ विक्रीत ४७७.३२ कोटींवर वाढ झाली आहे. तर निकालानुसार ,करपूर्व कमाई इयर ऑन इयर बेसिसवर ३७८.६७ कोटींवर पोहोचली आहे ‌ कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर ४३% वाढ झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत ९२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत १३२ कोटीवर वाढ झाली होती. तर एकूण उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर २८% वाढ झाली होती ज्यामध्ये हे उत्पन्न ४७९ कोटींवर पोहोचले होते. कंपनीच्या व्यवस्थापना अंतर्गत मालमत्तेत (Asset Under Management AUM) आकडेवारीतही २६.३% वाढ झाली आहे. असेट क्वालिटीत जैसे थे राहून जीएनपीएत (Gross Non Performing Assets NPA) सुधारणा झाली होती. असे असताना सुद्धा आज बाजारातील अस्थिरतेचा फटका शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बसला. आज आगामी तिमाहीतील निष्कर्षावर गुंतवणूकदार प्रतिक्षा करत असताना आज सेन्सेक्स एक्सपायरीही आहे. दुसरीकडे सावधगिरी बाळगली गेल्याने गुंतवणूकदारांचा ठोस पाठिंबा अद्याप कंपनीच्या शेअर्समध्ये मिळालेला नाही. मात्र कंपनीचा शेअर मजबूत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून व्यापक बाजारातील किंमतीतील सुधारणेसह शेअरमधील आगामी हालचाल अपेक्षित आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >