प्रतिनिधी: मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर आज खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घ्या शेअरची यादी
१) Waaree Energies- वारी एनर्जीज कंपनीच्या शेअरला ब्रोकरेज कंपनीने बाय कॉल दिला आहे. कंपनीने ३३७० रूपये प्रति शेअर या सामान्य खरेदीसह (Common Market Price CMP) लक्ष्य किंमत (Target Price TP) ४००० रुपये प्रति शेअर दिली आहे. कंपनीच्या मते हा शेअर भविष्यात १९% अपसाईड (वरच्या पातळीला) जाऊ शकतो. कंपनीने आपल्या उर्जा निर्मिती क्षमतेत वाढ केली आहे. १०० गिगावॉटपर्यंत असलेली पहिल्या तिमाहीतील क्षमता आर्थिक वर्ष २०२८ मध्ये १६० गिगावॉटवर वाढू शकते असे कंपनीने स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा निर्मितीच्या अनुकूल ध्येयधोरणाचा फायदा कंपनीच्या उर्जा निर्मितीला होऊ शकतो. ब्रोकरेज कंपनीच्या मते, कंपनीच्या उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात स्थानिकीकरण (Localisation) विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरला बाय कॉल दिला आहे. मात्र ब्रोकरेज कंपनीने वाढलेल्या स्पर्धात्मकतेचा, युएस बाजारातील प्रभाव, नफात्मकता, वाढलेला खर्च, क्षणिक परिस्थिती यामुळे हे आव्हानही कंपनीसमोर असल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे.
२) Bharati Airtel- भारती एअरटेल कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल (खरेदी करा) दिला आहे. १२% अपसाईड (वाढीसह) सामान्य खरेदी किंमत २११० रूपये प्रति शेअर दिली असून लक्ष्य किंमत २३६५ रूपये प्रति शेअर दिली आहे. भारती एअरटेलने नोंदवलेल्या मजबूत निकालानंतर ईबीटा (EBITDA) तिमाही बेसिसवर (QoQ) ६% वाढला. भांडवली खर्च (Capital Expenditure Capex) तिमाहीत ३७% वाढला असून ११४ अब्ज रूपयांवर पोहोचला. आगामी वायरलेस उत्पादनातील अतिरिक्त १५% वाढीसह घरावरील ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. भांडवली खर्चातही कंपनी मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आफ्रिकेतही कंपनीच्या दुपटीने वाढ झाली आहे. याच बेसिसवर ब्रोकरेज कंपनीने शेअरला बाय कॉल दिला आहे.
३) SBI- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शेअरला कंपनीने बाय कॉल दिला आहे. ९५४ रूपये प्रति शेअरसह १३% अपसाईड वाढ ब्रोकरेजने वर्तवली आहे. लक्ष्य किंमत कंपनीने १०७५ रूपये प्रति शेअर ठेवली आहे. अहवालातील माहितीनुसार, एसबीआय बँकेच्या करोत्तर नफ्यात मोठी वाढ झाली. इयर ऑन इयर बेसिसवर १०%, व एकूण २१% वाढ झाल्याने एसबीआयला फायदा झाला. याव्यतिरिक्त येस बँकेतील आपले भागभांडवल विकल्याने एसबीआयला अतिरिक्त ४५.९ अब्ज रूपयांचा फायदा झाला. कर्ज पुरवठ्यात (Loan Book) मध्येही इयर ऑन इयर बेसिसवर १३% वाढ झाली आहे. त्यामुळे बँकेच्या शेअरला खरेदीचा सल्ला मोतीलाल ओसवालने दिला.






