मुंबई : काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच' या चॅट शोमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेसह फराह खानने हजेरी लावली होती. यावेळी फराहने तिच्या बॉलीवूडमधील प्रवासाबद्दल बरेच किस्से सांगितले. तसेच सिनेसृष्टीत होणाऱ्या महिलांच्या छळाबद्दल सांगताना तिने तिच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगितले.
सिनेसृष्टीतील छळाविषयी बोलताना फराहने एक किस्सा सांगितला. ती नृत्य दिग्दर्शन करत असतानाचा अनुभव फराहने कथन केला. नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम करत असताना एका दिग्दर्शकाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असे फराह म्हणाली.
मुंबई : उबरने प्रथमच मुंबईमध्ये मेट्रो तिकिटिंग सुरू केली असून, आता मेट्रो लाईन १ (वर्सोवा-घाटकोपर)ची तिकिटे थेट उबर ॲपवर उपलब्ध आहेत. यावर्षी दिल्ली ...
ती झोपेत असताना तो थेट तिच्या रूममध्ये घुसला. काहीतरी चर्चा करण्यासाठी तो माझ्या खोलीत आला आणि माझ्या शेजारी बसला. यावेळी मी त्याला तिथून हाकलून दिले; असे फराहने सांगितले.
ही घटना घडली, त्यावेळी तिथे ट्विंकल खन्ना देखील उपस्थित होती असेही फराहने सांगितले. यावर ट्विंकल म्हणाली की, "हो, मी त्या घटनेची साक्षीदार आहे. तो दिग्दर्शक फराहच्या मागे लागला होता. त्याला फराहचा फायदा घ्यायचा होता. फराहने त्याला खोलीबाहेर काढले.






