बारावी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ

मुंबई  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह ४ ते १० नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.


राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले, काही कारणांमुळे परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरू शकतात. राज्य मंडळातर्फे विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.


सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाइलमध्ये कॉलेज संस्था मान्यताप्राप्त विषय शिक्षक याबाबत योग्य माहिती भरून राज्य मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार