Thursday, November 6, 2025

काळी अंडी की सफेद अंडी... शरीरासाठी जास्त फायदेशीर कोणतं अंड ? जाणून घ्या सविस्तर

काळी अंडी की सफेद अंडी... शरीरासाठी जास्त फायदेशीर कोणतं अंड ? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : आजकाल लोक आपल्या प्रकृतीबद्दल जास्त सर्तक झालेत. सोप्या शब्दात सांगायच झाल्यास कधी काय खायचं व खायचं नाही याची जास्त लोक काळजी घेतात. बहुतांश लोक पौष्टिक फूड्‍सला प्रोत्साहन देतात. यात अंडी सुद्धा आहेत. मार्केटमध्ये सफेदपासून तपकिरी रंगाची अंडी उपलब्ध आहेत. आता काळ्या अंड्यांची सुद्धा चर्चा आहे. तुम्ही या बद्दल ऐकलं असेल किंवा सोशल मीडियावर पाहिलं असेल. सफेद अंड्यांपेक्षा काळी अंडी वेगळी दिसतात. याचं कवच काळं असतं. यात जास्त प्रोटिन, विटामिन आणि मिनरल्स असतात. केस, स्कीन आणि इम्युनिटीसाठी हे विटामिन्स चांगले असतात. सफेद, तपकिरी आणि काळी अंडी यात वेगळेपण काय? जाणून घेऊया.

काळी अंडी कडकनाथ कोंबडीची असतात. भारतात आढळणाऱ्या कोंबड्या खास प्रजातीच्या आहेत. काळे पंख, ब्लॅक मीट आणि डार्क कलर. कडकनाथ कोंबडी ही मध्य प्रदेशच्या आदिवासी भागात आढळते. या कोंबडीची अंडी जास्त स्वादिष्ट, जास्त प्रोटीन आणि कमी फॅटची असतात. फिटनेसची आवड असणाऱ्या लोकांना ही अंडी आवडतात.

कडकनाथ अंडी पोषणाच्या बाबतीत इतर अंड्यांपेक्षा अधिक चांगली आहेत. १०० ग्रॅम काळ्या अंड्यात जवळपास १५ .६ ग्रॅम प्रोटीन असतं. सफेद आणि तपकिरी अंड्याच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. त्याशिवाय यात फॅट (१ ग्रॅम)आणि कोलेस्ट्रॉल (१८० मिलीग्रॅम) खूप कमी आहे.नॉर्मल अंड्यामध्ये फॅट जवळपास ५ .८ ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल ३७२ मिलीग्रॅम आहे. जर, तुम्ही जिममध्ये जाता. मसल्स बनवायचेत, वजन कंट्रोलमध्ये ठेवायचय, तर कडकनाथ अंडी हा उत्तम पर्याय आहे.

कडकनाथ अंड्यात काय असतं?

कडकनाथ अंड्यात फक्त प्रोटीनच नाही, तर विटामिन, मिनरल आणि अमीनो एसिड्स सुद्धा आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सर्वप्रथम रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीर वेगवेगळ्या आजारांशी उत्तम प्रकारे लढू शकतं. सोबतच स्नायू मजबूत होतात.

कुठली अंडी जास्त फायद्याची?

काळी आणि सफेद दोन्ही अंडी शरीरासाठी फायद्याची आहेत. पण स्ट्रॉंग शरीराचा विषय असेल, तर कडनाथ अंडी शरीरासाठी चांगली आहेत . यात बाकीच्या अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन, कमी फॅट आणि एंटीऑक्सीडेंट्स घटक आहेत. त्यामुळे शरीर अजून मजबूत होतं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा