Thursday, November 6, 2025

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी): कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी दिल्यानंतर महापालिकेच्या ए विभागाच्या वतीने मंगळवारी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले.

अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जात आहे.

अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

या कारवाई अंतर्गत वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या कुलाबा कॉजवे येथील एकूण ६७ अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment