पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर होताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला खिंडार पडले आहे. खेड तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उद्या (६ नोव्हें) चाकण येथे होणार आहे. अतुल देशमुख यांनी पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक राजकीय समीकरणांमुळे हा निर्णय घेतला असल्याचे कळते.
देशमुख यांची खेड तालुक्यात चांगली पकड असून, स्थानिक पातळीवर अनेक कार्यकर्ते जोडले आहेत. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. ते एका वर्षापूर्वीच भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत दाखल झाले होते. देशमुख यांच्यासह चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपालिकांतील नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांसह अनेक कार्यकर्तेही शिंवसेनेत दाखल होणार आहेत.






