Wednesday, November 5, 2025

मेहली मिस्त्री यांची धर्मादाय आयुक्तांकडे धाव हकालपट्टीवर कॅव्हेट दाखल करत दिला मोठा 'इशारा'

मेहली मिस्त्री यांची धर्मादाय आयुक्तांकडे धाव हकालपट्टीवर कॅव्हेट दाखल करत दिला मोठा 'इशारा'

प्रतिनिधी:टाटा समुहातील वरिष्ठ संचालक व शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांनी आता आपल्या हकालपट्टीला आव्हान देण्याचे ठरवले आहे. टाटा समुहाने संचालक मंडळातून मिस्त्रींची बहुमताने हकालपट्टी केली होती. त्यालाच आव्हान देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांकडे कॅव्हेट दाखल केला आहे. मेहली मिस्त्री यांनी आपल्याला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी मिळावी यासाठी त्यांनी आपली तक्रार आयोगाकडे दाखल केली. यापूर्वी शुक्रवारी टाटा सन्स संचालक मंडळाने मेहंदी मिस्त्रींची हकालपट्टी घोषित केली.

प्रामुख्याने मेहली मिस्त्री यांच्याकडे कंपनीचे १८% भागभांडवल आहे. इतके प्रभावी भांडवल असताना टाटा समुहातील आणखी तीन प्रभावशाली संचालक स्वतः टाटा सन्स अध्यक्षपदी विराजमान झालेले नोएल टाटा, उद्योगपती वेणू श्रीनिवासन, माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांनी मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला होता. दुसरीकडे मात्र रतन टाटांची सावत्र बहीण शिरीन व देना जेजीभॉय यांनी मात्र मेहली मिस्त्री यांना पाठिंबा दर्शविला आहे. वरिष्ठ वकील देरियस खंबाटा, शिरिन, देना, मिस्त्री यांनी टाटा ट्रस्ट माध्यमातून दिवंगत रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रातील तरतूदींची अंमलबजावणी केली होती. टाटा सन्स यांच्या वार्षिक बैठकीतील नव्या तरतुदीनुसार अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळाची पुन्हा एकदा नियुक्ती करावी असा प्रस्ताव पारित करण्यात आला होता. मात्र मेहली मिस्त्री व नोएल टाटा यांच्यातील खटके उडत असताना हा वादंग टोकाला गेला. या दोन गटांतील वाद सर्वश्रुत आहे. म्हणूनच नोएल टाटा गटाने मेस्त्री यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. इतर संचालकांना कायमस्वरूपी संचालक मंडळावर नियुक्त करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. यावर मेहली मिस्त्री यांच्याकडे प्रभावी भागभांडवल असल्याने कंपनीच्या कामकाजात त्यांचा हस्तक्षेप वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या आठवड्यात त्यांनी टाटा समुहाला एका मेलद्वारे सलसगट विजय सिंह समावेत मेहली मिस्त्री यांचीही पुन्हा नियुक्तीचा पारित करण्याचा प्रस्ताव दिला होता. टाटा समुहाने किंबहुना तो विजय सिंह यांच्यासह मिस्त्री यांनाही संचालक मंडळावर नियुक्त होण्याचे संकेत दिले. मात्र वादंग वाढल्याने कंपनीतील अंतर्गत तरतूदीचा वापर करत मेहली मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आली होती.आता त्यांनी कॅव्हेट दाखल केल्याने हा वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.

टाटा सन्समध्ये एकूण ५१% भागभांडवल दोराबजी टाटा ट्रस्ट, व रतन टाटा ट्रस्ट यांच्याकडे आहे. टाटांकडे बहुतांश शेअर भागभांडवल असले तरी शापोरजी पालोनजी समूहाचे सर्वेसर्वा मेहली मिस्त्री यांच्याकडे टाटा ट्रस्टमध्ये १८% भागभांडवल आहे जे निर्णय प्रक्रियेत अत्यंत प्रभावशाली मानले जाते. संचालक वेणू श्रीनिवासन यांचीही नुकतीच पुन्हा एकदा नियुक्ती झाली होती. त्यांच्यासह उर्वरित संचालक नव्या प्रस्तावानुसार आजीवन संचालक मंडळाचे सदस्य होऊ शकतील असे सांगितले जात आहे.अर्थात मिस्त्री व टाटा गटातील अविश्वास व मतभेदांमुळे मिस्त्री यांनी टाटा समुहाला ही नवी पुर्ननियुक्तीची गळ घातली. त्यामुळे पेचप्रसंग समुहासमोर यापूर्वही उभा झाला होता.

यापूर्वी सेबीने कंपनीला टाटा सन्स सूचीबद्ध करण्यासाठी दिलेली मुदत आता ओलांडली असली तरी यावर ठोस निर्णय झाला नव्हता. परंतु सेबीने कामकाज सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दाखवला असताना मेहली मिस्त्री व त्यांच्या समर्थकांनी लवकरात लवकर कंपनी सूचीबद्ध करावी यासाठी शिफारस केली होती. मेस्त्री समुहाला आपले भागभांडवल विकत त्यातून तरलता निधी उभा करून आपले कर्ज थकीत देणी चुकती करायची होती. मेस्त्री यांनी अट टाकलेल्या वृत्तावर या प्रकरणाची माहिती असले ल्या लोकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की मिस्त्री यांच्या संमतीसोबत एक अट होती, भविष्यातील सर्व विश्वस्त नूतनीकरण एकमताने मंजूर केले जावे आणि जर भविष्यात पुनर्नियुक्तीसाठी कोणताही ठराव एकमताने झाला नाही तर त्यांची मान्यता मागे घेतली जाईल. अशी पहिली नूतनीकरणाची अट मिस्त्री यांची स्वतःची असेल. मिस्त्रींनी घातलेली अट त्यांना नूतनीकरण न देण्याचा आणि त्याद्वारे त्यांना ट्रस्टमधून काढून टाकण्याचा कोणताही निर्णय घेण्यास प्रतिबंध करते.

तत्पूर्वी मात्र सावत्र बहीणची भूमिका स्पष्ट असताना रतन टाटा यांचे बंधू जिमी टाटा यांनी आपली टाटा ट्रस्टमधील आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे हे द्वंद्व वाढत असताना आगामी टाटा ट्रस्ट संचालक बैठकीत काय प्रस्ताव पारित होईल यावर संभ्रम कायम आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >