प्रतिनिधी:आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थिती बदलत असताना सातत्याने युएस अर्थकारणात बदल होत आहे. याचाच पुढील अध्याय म्हणून प्रथमच क्रिप्टोकरन्सीमध्ये विशेषतः बिटकॉइनमध्ये थेट ७.४% घसरण झाली आहे. अर्थतज्ज्ञांसह युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेरोम पॉवेल यांच्या विविध विधानाचा आढाव गुंतवणूकदार काढतात. एकीकडे नुकत्याच व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात केली असताना डिसेंबर महिन्यात तिसऱ्यांदा दरकपात होईल अशी शक्यता गुंतवणूकदारांनी व्यक्त केली होती. मात्र यावरील अनिश्चितता कायम राहिल्याने सुरू असलेल्या क्रिप्टोग्राफीत आज किंमत सुधारणा (प्राईज करेक्शन) झाली.ऑक्टोबर महिन्यातील ११००० डॉलरची पाठिंबा पातळी (सपोर्ट लेवल) तोडण्यास आज अस्थिरता परिणामकारक ठरली. तसेच उंचावलेल्या डॉलर दरपातळीने रॅलीला मात्र ब्रेक लावला. ७.४% घसरलेल्या क्रिप्टोकरन्सीने वर्षानुवर्षे (इयर ऑन इयर बेसिसवर) ९६७९४ डॉलरची पाच महिन्यातील निच्चांकी पातळी गाठली आहे.
तसेच गेल्या तीन महिन्यांत तरलता कार्यरत करण्यासाठी व किंमत सुधारणेसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी क्रिप्टोची विक्री केली ज्याचा फटका चलनाच्या किंमत बास्केटला बसला आहे. माहितीनुसार, न्यूयॉर्क बाजारात क्रिप्टोकरन्सी ९६७९४ डॉलर दरपातळीवर घसरली होती. गेल्या महिन्यातील तुलनेत थेट २०% चलन कोसळले आहे. ६ नोव्हेंबरला क्रिप्टोत शेवटची वाढ झाली होती ज्यामध्ये दरपातळी १२६००० डॉलर प्रति क्रिप्टो पोहोचली आहे.
ब्लूमबर्ग वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शेअर अथवा इक्विटी बाजारात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे या व्हर्च्युअल करन्सीत 'बिअरिश' क्रियाकलाप सुरु आहे. इतर अल्ट चलनाच्या बास्केटही मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता व्हर्च्युअल चलनातही सुरु आहे. यावर्षी क्रिप्टोसह इतर चलनात गुंतवणूक करत असलेल्या लघू गुंतवणूकदारांनाही या अस्थिरतेचा फटका बसला आहे. त्यामुळे या टोकन किंमतीत ५०% पेक्षा अधिक पातळीवर नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे.
कॉइनमार्केटकॅप या संस्थेच्या अहवालातील माहितीनुसार, गेल्या महिन्यात सरासरी ८४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे. बाजार किंमतीवर आधारित विश्लेषणानुसार, आर्थिक वर्ष २०१८ नंतर ही क्रिप्टो बाजारातील सर्वाधिक घसरण झाली. प्रामुख्याने युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफ शुल्कवाढीनंतर यांचा अंतर्गत फटका क्रिप्टोग्राफीत बसला आहे. व्यापारी तूट भरून काढताना निर्यात आयातीतील अतिरिक्त नुकसान, तसेच गुंतवणूकीची बहिर्वहन, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील गुंतवणूकीची अतिरिक्त जावक यांचा तांत्रिक दृष्ट्या परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. त्यामुळे पूर्वीच्या अतिरिक्त रॅली गुंतवणूकदारांनी शमवल्याने युएससह जागतिक गुंतवणूकदारांचे आज मोठे नुकसान झाले आहे.
ही घसरण पहिल्यांदाच झालेली नाही. सर्वाधिक प्रभावी व्हर्च्युअल अथवा डिजिटल चलन मानले जाणारे बिटकॉइन क्रिप्टोकरन्सीची ११ ऑक्टोबरला ऐतिहासिक पडझड झाली होती. याशिवाय इतरही प्रमुख फळीतील इथिरियम, टेथर, रिपल, सोलाना या डिजिटल चलनातही मोठी घसरण झाली. आकडेवारीनुसार या डिजिटल चलन बाजारातील बाजार भांडवल ४.३० ट्रिलियन डॉलरवरून ११ तारखेला ३.७४ ट्रिलियन डॉलरवर कोसळले होते.
सध्या कुठली डिजिटल करन्सी प्रभावी?
माहितीनुसार, सर्वाधिक बिटकॉइन ही प्रभावी क्रिप्टोकरन्सी मानली जाते. या चलनाचा बाजार हिस्सा एकूण बाजाराच्या ५९.८% आहे. त्यानंतर इथेरियम क्रिप्टोकरन्सीचा क्रमांक लागतो. या चलनाचा बाजार हिस्सा एकूण बाजाराच्या १२.२% असून उर्वरित चलनाचा एकूण बाजार हिस्सा एकूण बाजाराच्या तुलनेत २७.९% आहे.






