प्रतिनिधी:गेल्या दोन दिवसात क्रिप्टोग्राफीत गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. कॉइनमार्केटकॅप या संस्थेच्या अहवालातील माहितीनुसार, गेल्या महिन्यात सरासरी ८४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे. बाजार किंमतीवर आधारित विश्लेषणानुसार, आर्थिक वर्ष २०१८ नंतर ही क्रिप्टो बाजारातील सर्वाधिक घसरण झाली आहे. यामागील अनेक कारणे भूराजकीय अस्थिरतेमागे दडली आहेत. आज बिटकॉइनमध्ये झालेली ७% घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंताजनक ठरली आहे. २४ तासांच्या आता अल्ट चलनाच्या अस्टर, अपटोस, वर्ल्ड लायब्ररी फायनांशियल, टोनकॉइनमध्ये १०% पातळीपेक्षा अधिक पडझड झाली आहे.
तांत्रिकदृष्ट्या क्रिप्टोग्राफीतील घसरण दैनिक चार्टवर 'हेड अँड शोल्डर' पॅटर्न दर्शवत आहे. २०० दिवसांच्या डीएमए (डेली मुव्हिंग अँव्हरेज) आधारे ही खालच्या पातळीवर झुकली गेलेली पडझड सूचित करत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ही पडझड बिटकॉइनमध्ये दर्शविली जात असताना तज्ञांच्या मते, किमान आधारभूत पातळीही घसरली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बिटकॉइन घसरण्यामागे मूलभूत कारणे काय?
१) सातत्याने उसळणारा डॉलर - सातत्याने उसळत असलेला डॉलर क्रिप्टोग्राफीत क्रियाकलाप मर्यादित करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. तांत्रिकदृष्ट्या डॉलर व बिटकॉइन विरूद्ध दिशेने प्रवास करतात. यामागे मागणी पुरवठा यांचे गणित अंतर्भूत आहे. असे असताना फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात झाल्यानंतर युएस डॉलरचा चढता आलेख प्रतिकात्मक कारवाई करत असल्यामुळे बिटकॉइन व इतर डिजिटल चलनात घसरण होत आहे. युएस बहुतांश अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, डिसेंबर महिन्यात फेड व्याजदरात तिसऱ्यांदा कपात अपेक्षित आहे. ती २५ बेसिस पूर्णांकाने होऊ शकते. मात्र अमेरिकेतील महागाईची नकारात्मक आकडेवारी, रोजगार व आगामी कामगार आकडेवारी ही दर अथवा दरकपात ठरवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. युएस फेड गव्हर्नर जेरोम पॉवेल यांनी वेळोवेळी उपलब्ध असलेल्या युएस बाजारातील आकडेवारीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नक्की दरकपात होईल यावर अनिश्चितता कायम आहे.
२) तरलता प्राप्ती- युएस बाजारातील तरलता राखण्यासाठीही गुंतवणूकदार उत्सुक आहेत. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत क्रिप्टोग्राफीतील 'सेल ऑफ वाढत असताना त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम गुंतवणूकदारांवर व अंतिमतः डिजिटल करन्सी बाजारात होत आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्याने व विशेषतः डॉलर निर्देशांकात म्हणजेच डीएक्सवाय निर्देशांकात वाढ होत असल्याने हे असंतुलित गुणोत्तर नकारात्मक होताना तांत्रिक दृष्ट्या दिसते. यापुढेही दरकपात झाल्यास बाजारात तरलता वाढू शकते. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिप्टोकडे गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष होऊ शकते.






