Tuesday, November 4, 2025

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजार घसरणीकडे 'या' कारणामुळे सेन्सेक्स १५६.६७ व निफ्टी ६६.१० अंकाने घसरला

Stock Market Update: सकाळच्या सत्रात शेअर बाजार घसरणीकडे 'या' कारणामुळे सेन्सेक्स १५६.६७ व निफ्टी ६६.१० अंकाने घसरला

मोहित सोमण: अस्थिरतेचे सत्र आजही कायम राहू शकते. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली आहे. शेअर बाजारात सुरु झालेली घसरण प्रामुख्याने घसरलेल्या लार्जकॅप शेअरसह बँक, ऑटो, फायनांशियल सर्विसेस, आयटी शेअरमुळे झाली आहे. खरं तर मजबूत फंडामेंटल व टेक्निकल रॅली ही या निर्देशांकानी रोखली असली तरी मिड स्मॉल कॅप सह मिडिया, रिअल्टी, तेल व गॅस या निर्देशांकानी वाढ नोंदवल्याने आज बाजारात एक किमान आधारभूत पातळी गाठता आली आहे. सेन्सेक्स सुरुवातीच्या कलात १५६.६७ व निफ्टी ६६.१० अंकांनी घसरला आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम असताना सर्वाधिक वाढ आज मिडिया (०.५०%), रिअल्टी (०.२०%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण ऑटो (०.७१%), प्रायव्हेट बँक (०.३५%), आयटी (०.४८%), एफएमसीजी (०.४८%) निर्देशांकात झाली आहे.

निफ्टी व्यापक निर्देशांकातही घसरणीकडे कौल अधिक आहे. सकाळच्या सत्रात मिडकॅप १५० (०.०५%), मिडकॅप १०० (०.१०%) वगळता इतर निर्देशांकात घसरण झाली जी सर्वाधिक स्मॉलकॅप ५० (०.४२%), निफ्टी १०० (०.२२%), निफ्टी २०० (०.१८%) निर्देशांकात झाली आहे. सकाळच्या सत्रात भूराजकीय स्थितीतील अनिश्चितता बाजारात झळकत असताना अखेरच्या सत्रात घरगुती गुंतवणूकदारांकडून होणारी अतिरिक्त गुंतवणूक, तिमाही निकाल, व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारकडून होणारी विक्री अथवा खरेदी यावर निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात प्रभाव अखेरच्या सत्रात स्पष्टपणे दिसेल. दरम्यान मिडकॅपमध्ये असलेली तेजी बाजारात स्थैर्य देईल का हा आजच्या बाजारातील कळीचा मुद्दा असणार आहे.

आज आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात हेंगसेंग (०.२२%), स्ट्रेट टाईम्स (०.०३%), जकार्ता कंपोझिट (०.१६%) निर्देशांकाचा अपवाद वगळता इतर निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण कोसपी (१.९५%), निकेयी २२५ (०.५०%), गिफ्ट निफ्टी (०.४०%) निर्देशांकात झाली आहे. काल युएस बाजारात डाऊ जोन्स (०.२९%) वगळता इतर दोन एस अँड पी ५०० (०.१७%), नासडाक (०.४३%) निर्देशांकात वाढ झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ 3Mइंडिया (१२.८७%), हिताची एनर्जी (९.३८%), टीबीओ टेक (७.४०%), सिटी युनियन बँक (५.९१%), आर आर केबल्स (४.३०%), ज्योती सीएनसी ऑटो (३.७५%), भारती एअरटेल (२.७५%),निवा बुपा हेल्थ (२.५९%), दीपक फर्टिलायजर (१.९८%) या समभागात वाढ झाली आहे.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण रिलायन्स पॉवर (३.८३%), फाईवस्टार बस फायनान्स (३.४१%), हिरो मोटोकॉर्प (३.१०%), पॉवर ग्रीड (३.०९%), टाटा कंज्यूमर (२.६५%), वेलस्पून कॉर्पोरेशन (२.४६%), कोल इंडिया (२.२०%), सीडीएसएल (१.९७%), डॉ अग्रवाल हेल्थकेअर (१.८२%), ब्लू स्टार (१.७८%), अदानी पॉवर (१.७४%) समभागात घसरण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >