मुंबई (खास प्रतिनिधी) : मागील चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मुहूर्तमेढ अखेर रोवली गेली. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला. ही निवडणूक आणि डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक कार्यक्रम १५ डिसेंबर पर्यंत जाहीर होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पर्यंत पार पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आगामी राजकीय घडामोडींना गती मिळण्याची शक्यता आहे.या ताज्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून, सर्व पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य विधिमंडळ अधिवेशन पार पडले जाणार आहे. हे अधिवेशन १३ नोव्हेंबर पर्यंत असेल. त्यामुळे येत्या १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन महापालिका आणि महानगर पालिका यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे घडल्यास मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पार पडली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबई महापालिकेची मुदत ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपुष्टात आली आहे. तेव्हापासून महापालिकेत प्रशासक नियुक्त आहे. मुंबईसह इतर २९ महापालिकांच्या निवडणूक लांबणीवर पडल्याने या सर्व महापालिकेच्या निवडणूक त्वरीत घेण्याची मागणी होत आहे.






