मोहित सोमण:देशातील सर्वात मोठी पीएसयु बँक एसबीआयने (State Bank of India SEBI) आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) इयर बेसिसवर ४% वाढला आहे. बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) ३.२८% वाढ झाल्याचे बँकेने आपल्या तिमाही निकालात स्पष्ट केले आहे. बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीत तुलनेत ८.९१% वाढ झाल्याने तो ३१९०४ कोटींवर पोहोचला आहे. माहितीनुसार, बँकेचा व्यवसाय थेट १०० ट्रिलियन रूपयांवर गेला आहे. बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या आरओई (Return on Equity RoE), आरओए (Return on Assets RoA) अनुक्रमे २०.२१%,१.१५% पातळीवर पोहोचले आहे.
बँकेच्या अँडव्हान्सेस (आगाऊ ठेवीत) इयर ऑन इयर बेसिसवर १२.७३% वाढ नोंदवली गेली आहे. तसेच बँकेच्या परदेशी शाखांच्या ठेवीत १५.०४% वाढ इयर ऑन इयर बेसिसवर झाली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांच्या ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर १५.०९% वाढ झाली आहे. एसएमई अँडव्हान्स (SME Advances) इयर ऑन इयर बेसिसवर १८.७८% वाढ झाली आहे. बँकेच्या एकूण ठेवीतही (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ९.२७% वाढ झाली आहे. बँकेच्या कासा ठेवीत (Current Account Saving Account CASA) इयर ऑन इयर बेसिसवर ८.०६% वाढ झाली आहे. कासा गुणोत्तर ३९.६३% वाढ ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढ झाली आहे असे बँकेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बँकेच्या स्थूल एनपीत (Gross Non Performing Assets NPA) इयर ऑन इयर बेसिसवर ४० बेसिसने घसरण झाली असून इयर बेसिसवर हे प्रमाण १.७३% झाल्याने बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेच्या निव्वळ एनपीए (Net NPA) इयर बेसिसवर ११ बेसिस पूर्णांकाने वाढ झाल्याने ते गुणोत्तर ०.४२% पर्यंत घसरले. सीएआर गुणोत्तरात (Capital Adequacy Ratio) इयर ऑन इयर बेसिसवर १४.६२% वर पोहोचले आहे.
'बँकेचे मला वाटते की आपण वित्तीय सेवांमध्ये सर्वात सौम्य मालमत्ता गुणवत्तेच्या जीवनचक्रातून जात आहोत. आणि मला खात्री आहे की अंडररायटिंगमध्ये बरीच सुधारणा झाली आहे आणि आपण ज्या पद्धतीने पाहत आहोत आणि डेटा उपलब्धता आहे, त्यामुळे मालमत्ता गुणवत्तेचे चक्र आणखी काही काळ चालू राहील. मला वाटते की बँकांचे बॅलन्स शीट चांगले आहेत आणि नफा सुधारला आहे. आणि जोपर्यंत क्रेडिट वाढीचा प्रश्न आहे, तोपर्यंत क्रेडिट वाढ होत नाही असे म्हणणे योग्य नाही. काही क्षेत्रे अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत, अर्थातच. आणि जेव्हा आपण कॉर्पोरेट क्रेडिटबद्दल बोलतो, तेव्हा ते देशातील ग्राहकांच्या मागणीची वाट पाहत आहे आणि आपल्याला असे दिसते की उपभोगाच्या बाजूने एक दृश्यमान वाढ आहे.' असे एसबीआय बँकेचे चेअरमन सी एस शेट्टी म्हणाले इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना म्हटले आहेत.

    




