Tuesday, November 4, 2025

Breaking: देशाचे 'जीपी' म्हणून ओळखले जाणारे नामांकित उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचे ८५ व्या वर्षी निधन

Breaking: देशाचे 'जीपी' म्हणून ओळखले जाणारे नामांकित उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचे ८५ व्या वर्षी निधन

प्रतिनिधी:हिंदुजा उद्योगसमूहाचे आश्रयस्थान व चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. ते ८५ वर्षाचे होते. थोरले बंधु श्रीचंद हिंदुजा यांच्या निधनानंतर त्यांनी चेअरमन पदाची सूत्रे २०२३ दरम्यान हाती घेतली होती. व्यवस्थापनावर त्यांच्या हातखंडा होता त्यांच्या कार्यकुशलतेमुळे उद्योगसमुहाचा विस्तार सुरू होता. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. 'जीपी' म्हणून नावाने प्रसिद्ध असलेले हिंदुजा हिंदुजा समुह (Hinduja Group) व हिंदुजा ऑटोमोटिव्ह लिमिटेड (Hinduja Automotive Limited) या दोन संस्थाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.

सिंधी कुटुंबात जन्म झालेल्या हिंदुजा यांनी १९५९ साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. गल्फ ऑईलचे १९८४ अधिग्रहण व अशोक लेलँडचे १९८७ अधिग्रहण यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. हिंदुजा समुह तेल, उर्जा, फायनान्स, केबल टेलिव्हिजन, लुब्रिकंट, ट्रक निर्मिती, मिडिया, बँकिंग अशा विविध श्रेत्रात कार्यरत असणारा बहुराष्ट्रीय समुह (Multinational Corporation) आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >