Monday, November 3, 2025
Happy Diwali

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन  पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच

नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. परंतु, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात दिले.

नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन हे नागपूर येथे होत असते. विशेषतःहिवाळी अधिवेशनच नागपुरात घेण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घ्यायच्या आहेत. एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे तीन टप्प्यात या निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून आयोगाची तयारी सुरू आहे. या निवडणुकांसाठी अधिवेशनाची तारखेत बदल होण्याची चर्चा होती. हे अधिवेशन आठ, दहा दिवस लवकर होईल, अशीही चर्चा होती. परंतु, अद्याप प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारच्या सूचना नाहीत. निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता अधिवेशन ठरल्याप्रमाणे ८ डिसेंबरला सुरू न होता एक आठवडा पुढे ढकलले जाण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >