Tuesday, December 2, 2025

तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून बाहेर? सोशल मीडियावरील चर्चांवर ; अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर

तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून बाहेर? सोशल मीडियावरील चर्चांवर ; अभिनेत्रीचं स्पष्ट उत्तर

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या स्वानंदीची भूमिका साकारत आहे. अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं असून, तेजश्री आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या जोडीला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही दिवसांपासून तेजश्री मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.

याचं कारण म्हणजे तेजश्रीने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात ती एका व्यक्तीसोबत संवाद साधताना दिसली. त्या व्हिडिओला तिने ‘नवीन वेब सिरीज’ आणि ‘नवीन काम’ असे हॅशटॅग्स दिले होते. या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की, ती आता मालिकेतून बाहेर पडणार का?

या सर्व चर्चांवर पडदा टाकत तेजश्रीने स्वतःच इन्स्टा स्टोरीवर स्पष्टीकरण दिलं. “वीण दोघांतली ही तुटेना ही माझी मालिका आहे आणि ती सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही. झी मराठीशी असलेली वीण तुटणे नाही, लोभ असावा ” असं म्हणत तिने चाहत्यांची चिंता दूर केली. त्यामुळे पुढेही तेजश्री ‘स्वानंदी’च्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >