Monday, November 3, 2025

Tata Consumer Products Q2FY26 Results: टाटा कंज्यूमर प्रॉडक्टचा सुस्साट निकाल ११% निव्वळ नफा वाढत फंडामेंटलमध्येही सुधारणा

Tata Consumer Products Q2FY26 Results: टाटा कंज्यूमर प्रॉडक्टचा सुस्साट निकाल ११% निव्वळ नफा वाढत फंडामेंटलमध्येही सुधारणा

मोहित सोमण:टाटा कंज्यूमर प्रॉडक्ट (Tata Consumer Products) या टाटा समुहाच्या फ्लॅगशिप कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. टाटा कंज्यूमर प्रॉडक्ट कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ११% अधिक निव्वळ नफा (Net Profit) मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या ३५९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला ३९७ कोटीचा नफा प्राप्त झाला. टाटा कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) यामध्येही इयर ऑन इयर बेसिसवर १८% वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४२१४ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला ४९६६ कोटींचा महसूल मिळाला आहे. कंपनीच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या आंतरराष्ट्रीय महसूलातही इयर बेसिसवर १५% वाढ नोंदवली गेल्याने महसूल १२८८ कोटीवर पोहोचला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीच्या इतर उत्पन्नातही तिमाही बेसिसवर जूनमधील ४७७ कोटींच्या तुलनेत या सप्टेंबर तिमाहीत घसरण झाल्याने हे इतर उत्पन्न (Other Income) २८.५० कोटीवर पोहोचले आहे. इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या इतर खर्चातही (Expenses) वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या ५३१.४९ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ५९८.७९ कोटीवर वाढ झाली आहे. एकूण खर्चात गेल्या वर्षीच्या तिमाहीतील २८२९.४२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ३२३९.०९ कोटींवर वाढ झाली आहे.

जुलै-सप्टेंबर या कालावधीत टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्सचा कामकाजातील महसूल १८% वाढत ४९६६ कोटी गेला होता तत्पूर्वी जो गेल्या वर्षीच्या ४२१४ कोटी होता. याशिवाय आकडेवारीनुसार, कंपनीने स्थिर कामगिरी नोंदवली आहे . माहितीनुसार, ईबीटा (EBITDA) ज्याला ऑपरेटिंग नफा म्हणूनही ओळखले जाते, तो ७% वाढून ६२६ कोटींवरून ६७२ कोटी झाला आहे परंतु त्याचा ऑपरेटिंग नफा मार्जिन १३० बेसिस पूर्णांकाने कमी होऊन १३.५% झाले हे आकडेवारीतून स्पष्ट झाले.

'आंतरराष्ट्रीय व्यवसायात कॉफीच्या किमतीतील चलनवाढ आणि ब्रँड्समागील उच्च गुंतवणूकीमुळे भारतातील चहाच्या किमतीतील चलनवाढ कमी झाल्यामुळे ब्रँडेड व्यवसायाच्या कामकाजातील कामगिरीत सुधारणा झाली' असे टाटा कंझ्युमर प्रॉडक्टसने आपल्या एक्सचेंज फायलिंगमध्ये निकालाबाबत म्हटले आहे.

'मागील वर्षीच्या वाजवी मूल्याच्या वाढीतील बदलांमुळे नॉन-ब्रँडेड व्यवसाय नफ्यावर परिणाम झाला. उच्च ऑपरेटिंग नफा आणि कमी वित्त खर्चामुळे अपवादात्मक वस्तू आणि करांपूर्वीचा नफा ५२३ कोटी इतका आहे जो मागील वर्षाच्या त्याच तिमाहीच्या तुलनेत २३% जास्त आहे.

भारतीय मुख्य व्यवसायाने चहा आणि मीठ या दोन्ही क्षेत्रात सलग दुसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकी वाढ नोंदवली, टाटा संपन्नने त्याची मजबूत वाढीची गती सुरू ठेवली आणि रेडी-टू-ड्रिंक (RTD) व्यवसायाने मजबूत व्हॉल्यूम आणि मूल्य वाढ दिली' असेही कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

'या तिमाहीत, भारतातील पॅकेज्ड पेये व्यवसायाच्या महसुलात १२% वाढ झाली. तिमाहीत ५६% महसूल वाढीसह कॉफीने आपला मजबूत मार्ग सुरू ठेवला. टाटा टी अग्निने निवडक बाजारपेठांमध्ये श्रेणी-प्रथम ऊर्जा चहा (कॅफिनसह) लाँच केला' असे कंपनीने म्हटले आहे.

'अवेळी पाऊस आणि वाढलेल्या स्पर्धात्मक तीव्रतेला न जुमानता RTD (रेडी टू ड्रिंक) व्यवसायाने २५% महसूल वाढ दिली तसेच आम्ही आर्थिक वर्ष २६ च्या दुसऱ्या तिमाहीत स्थिर निव्वळ नफ्यात १८% ची मजबूत टॉपलाइन वाढ दिली, स्थिर निव्वळ नफा वाढला. चहा आणि मीठ या दोन्ही क्षेत्रातील भारतातील मुख्य व्यवसायात सलग दुसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकी वाढ झाली आहे. टाटा संपन्नने वाढीचा वेग कायम ठेवला आणि तिमाहीत अनेक नवीन उत्पादने लाँच केली' असे टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनील डिसोझा निकालावर मत व्यक्त करताना म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले आहेत की,'प्रतिकूल हवामान असूनही आरटीडी व्यवसायात जोरदार वाढ झाली. जीएसटी संक्रमणामुळे निर्माण झालेल्या अल्पकालीन आव्हानांना न जुमानता, कॅपिटल फूड्स आणि ऑरगॅनिक इंडियाने एकत्रितपणे स्थिर वाढ नोंदवली आणि नाविन्यपूर्ण लाँचसह त्यांचे पोर्टफोलिओ मजबूत केले' असे डिसोझा पुढे म्हणाले.

कंपनीच्या निव्वळ करोत्तर नफ्यात (Net Profit after tax PAT) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या २२३.०१ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत २८५.१९ कोटींवर वाढ झाली आहे. डेट टू इक्विटी गुणोत्तरात (Debt to Equity Ratio) गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ०.०८ तुलनेत या तिमाहीत ०.०५ वर घसरण झाली आहे. निव्वळ व्याज गुणोत्तरात (Net Profit Margin) मात्र गेल्या वर्षीच्या ७.३२% तुलनेत या तिमाहीत ७.९३% वाढ झाली आहे.

उत्पन्नाच्या घोषणेनंतर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे शेअर ०.७% वाढून ११७३.२५ पातळीवर वर पोहोचला होता. सत्र बंद होताना शेअर २.६२% उसळत ११९५.५० रूपये प्रति शेअरवर बंद झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा