Monday, November 3, 2025

Studds Accesories Limited IPO Day 3: बिडींग आज संपुष्टात तिसऱ्या दिवशीही जबरदस्त मागणी कायम ! एकूण सबस्क्रिप्शन ४१.३७ पटीवर पोहोचले

Studds Accesories Limited IPO Day 3: बिडींग आज संपुष्टात तिसऱ्या दिवशीही जबरदस्त मागणी कायम ! एकूण सबस्क्रिप्शन ४१.३७ पटीवर पोहोचले

मोहित सोमण:स्टड्स अँक्सेसरीज लिमिटेड (Studds Accesories Limited) आयपीओ बिडींगचा अखेरचा दिवस आज संपुष्टात आला आहे. एकूण ४५५.४९ कोटी रूपये पुस्तकी मूल्यांकन (Book Value) असलेल्या आयपीओला अखेरच्या १३ पटीने जबरदस्त सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यामुळे एकूण कंपनीच्या आयपीओला मजबूत ४१.३७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. शेवटच्या दिवशी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Qualified Institutional Investors QIB) आयपीओला ६१.६८ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (Non Institutional Investors NII) ६७.९६ पटीने, किरकोळ गुंतवणूकदारांकडून (Retail Investors) १८.३६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण आयपीओला ४८ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. पब्लिक इशूपैकी किरकोळ गुंतवणूकदारांकडून १८.६९ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ८१.७० पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ७१.४६ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. कंपनीने आयपीओसाठी ५५७ ते ५८५ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केला होता. ३० ऑक्टोबर ते आज ३ नोव्हेंबर या कालावधीत आयपीओ गुंतवणूकदारां साठी दाखल झाला होता.

किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४६२५ (२५ शेअर) रूपयांची गुंतवणूक अनिवार्य करण्यात आली होती. एकूण ४५५.४९ कोटी मूल्यांकनापैकी सगळेच ०.७८ कोटी शेअर ओएफएस (Offer for Sale OFS) साठी उपलब्ध होते. मधू भुषण खुराना, सिद्धार्थ भुषण खुराना, शिल्पा अरोरा हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. त्यामुळे आयपीओआधी कंपनीतील ७८.७८% भागभांडवल (Stake) आयपीओनंतर ६१.७६% कमी होईल. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १३६.६५ कोटींची गुंतवणूक प्राप्त केली होती.

१९७५ मध्ये स्थापन झालेली आणि १९८३ मध्ये स्थापन झालेली स्टड्स अ‍ॅक्सेसरीज लिमिटेड ही भारतातील हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे स्थित दुचाकी हेल्मेट आणि मोटारसायकल अ‍ॅक्सेसरीजची उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी 'स्टड्स' आणि 'एसएमके' ब्रँड अंतर्गत हेल्मेट डिझाइन करते, बनवते, मार्केट करते आणि विकते, तर इतर अ‍ॅक्सेसरीज 'स्टड्स' ब्रँड अंतर्गत विकल्या जातात. हेल्मेट, दुचाकी सामान, हातमोजे, हेल्मेट सुरक्षा रक्षक, रेन सूट, रायडिंग जॅकेट आणि आयवेअर. स्टड्स अ‍ॅक्सेसरीज लिमिटेड संपूर्ण भारतात त्यांची उत्पादने वितरीत करते आणि कंपनी ७० हून अधिक देशांमध्ये आपले उत्पादन निर्यात करते.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ११% वाढ झाली आहे. तर इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) २२% वाढ झाली आहे. मार्च २०२५ मधील ५९५.८९ कोटींच्या तुलनेत जून २०२५ मध्ये उत्पन्न घसरत १५२.०१ कोटीवर पोहोचले होते. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२५ मधील ६९.६४ कोटींच्या तुलनेत घसरत जून २०२५ मध्ये २०.२५ कोटींवर गेले आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) २३०२.१७ कोटी रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीच्या भविष्यातील फायद्यासाठी करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा