पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली. यामुळे गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे, अशी चर्चा सुरु होती. यामुळे गावात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच याबाबतीत स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. दरम्यान १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना घडल्याने गावकऱ्यांचा वन विभागावर रोष वाढला. त्यांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली.
नवी मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला भारताने नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या ...
संतप्त नागरिकांनी बेल्हे-जेजुरी महामार्गावर रास्ता रोको देखील केला. तसेच मुलाचा मृतदेह सोबत घेऊन नातेवाईकांसह गावकऱ्यांनी आंदोलन केले. वन विभागाच्या कार्यालयासह गाडीदेखील पेटवण्यात आली. या जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरखेड परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला आहे.






