Monday, November 3, 2025

शाहरुखचा ६० वा वाढदिवस! मात्र बॉलिवूड बादशहा घराच्या गॅलरीत आलाच नाही, चाहत्यांचा हिरमोड

शाहरुखचा ६० वा वाढदिवस! मात्र बॉलिवूड बादशहा घराच्या गॅलरीत आलाच नाही, चाहत्यांचा हिरमोड

मुंबई: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने आता साठी ओलांडली आहे. रविवारी २ नोव्हेंबरला शाहरुखचा साठावा वाढदिवस होता. त्यामुळे किंग खानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मुंबईतील मन्नत या त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. दरवर्षी शाहरुख त्याच्या वाढदिवसानिमित्त मन्नत येथील घराच्या गॅलरीमधून चाहत्यांची भेट घेतो. मात्र यावर्षी शाहरुख साठावा वाढदिवस असूनही गॅलरीमध्ये आला नसल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला.

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त लांब-लांबहून अनेक चाहते त्याला पाहण्यासाठी मन्नत बाहेर उभे होते. मात्र, शाहरुख खानने मन्नत बाहेर चाहत्यांशी भेट रद्द केली. आजवर त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना भेटण्याची परंपरा खंडित झाली नाही. मात्र यावर्षी ही परंपरा मोडली. त्यामुळे शाहरुखला पहिल्यांदाच प्रत्यक्षात पाहायला आलेले चाहते निराश झाले.

बादशहाने स्वतः अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना न भेटण्याचे कारण सांगत माफी मागितली आहे. शाहरुख खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'मी बाहेर येऊन माझी वाट पाहणाऱ्या माझ्या चाहत्यांना भेटू शकणार नाही. मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागतो. बाहेर असलेली गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे आणि सर्वांच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे, त्यामुळे माझ्या टीमने मला बाहेर न येण्याचा सल्ला दिला आहे.'

Comments
Add Comment