उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक
पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे काढून सत्ता मिळत नाही; महाराष्ट्रात विकास करणाऱ्यांनाच जनता साथ देते.” राज्याच्या विकासाचा चेहरा आणि जनतेला दिलेल्या वचनांची आठवण करून देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातून विरोधकांवर विरोधकांवर थेट राजकीय प्रहार केला. कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर निशाणा साधला आणि सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. याप्रसंगी त्यांच्यासोबत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना आम्ही अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. महायुती सरकारने विकासकामांना गती दिली असून अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. महायुती सरकारची दुसरी इनिंग सुरू आहे. राज्यातील जनतेला विकास कोणी केला हे स्पष्ट माहीत आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही मोर्चे-आंदोलने काढली तरी आमच्या विजयावर परिणाम होणार नाही. आमचा अजेंडा महाराष्ट्राच्या विकासाचा आहे.” असे जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी विरोधकांच्या मोर्चातील हवा काढून टाकली. कार्तिकी एकादशीच्या पूजनाचा मान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिंदेंनी शेतकरी, कष्टकरी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण सुख-समृद्धीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. ते पुढे म्हणाले, “महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला आहे. विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही जनता आमच्या पाठीशी ठाम उभी राहील.” महायुतीचा भगवा झेंडा फडकेला असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज देऊन रक्कम खात्यात जमा केली जात आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही.” हा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. नगरविकास विभागाने चंद्रभागा नदीसाठी १२० कोटींचा टप्पा मंजूर केल्याची माहिती देत त्यांनी सांगितले.
बळीराजाला सुखी ठेवा, एकनाथ शिंदेचे पांडुरंगाला साकडे
बळीराजावर आलेले अरिष्ट दूर कर, त्यांना सुख व समाधानाचे दिवस येऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री शिंदे पांडुरंगाला घातले. श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. राज्यातील शेतकऱ्यावर मोठे संकट आलेले आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून शासनाने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलेले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांना कमी वेळ लागावा तसेच दर्शन रांगेमध्ये पाणी, बैठक व्यवस्था यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्या याकरिता तिरुपतीच्या धर्तीवर दर्शन मंडप निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केलेला होता.






