Monday, November 3, 2025

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकात नवा पादचारी पूल ; प्रवाशांची मोठी सोय,

मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. स्थानकात नव्या पादचारी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं असून, या पुलामुळे आता प्रवाशांना रूळ ओलांडण्याची वेळ येणार नाही. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एमयूटीपी प्रकल्पांतर्गत हा पूल उभारला आहे. या पुलामुळे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागासह सर्व प्लॅटफॉर्म एकमेकांशी जोडले जाणार आहेत. गर्दीच्या वेळेतही प्रवाशांची वर्दळ आता अधिक सुकर होईल. या नव्या पुलामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

पुलाची वैशिष्ट्ये:

लांबी: ६६ मीटर रुंदी: ६ मीटर बांधकाम खर्च: सुमारे ६ कोटी रुपये जोडणी: प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ तसेच पूर्वेकडील भाग पायऱ्या: प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अडीच ते तीन मीटर रुंदीच्या पायऱ्या

या पुलाला स्टेशनच्या पूर्वेकडील ५ मीटर रुंदीच्या स्कायवॉकचीही जोडणी मिळणार आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील ९.५ मीटर रुंदीच्या डेक्सलाही हा पूल जोडणार आहे. यामुळे सर्व प्लॅटफॉर्म, पूल आणि स्टेशन डेक यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >