मोहित सोमण:मजबूत फंडामेंटलसह मजबूत निकालानंतर इंटलेक्ट डिझाईन एरिना लिमिटेड (Intellect Design Arena Limited) या शेअरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. आज हा शेअर सकाळी १०.२४ वाजेपर्यंत ७% उसळत १२१२.९० रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. बाजारात सत्र सुरुवातीला हा शेअर ८% वर उसळला होता. आज हा शेअर ११४४.५० रूपये प्रति शेअर इंट्राडे उच्चांकावर पोहोचला आहे. इंटलेक्ट डिझाईन एरिना लिमिटेड तिमाही निकालात म्हटल्याप्रमाणे कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ९४% वाढ झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५२.४७ कोटींच्या तुलनेत यंदा कंपनीला १०२ कोटींचा निव्वळ (Net Profit) नफा प्राप्त झाला होता. कंपनीच्या महसूलातही इयर ऑन इयर बेसिसवर ३६% वाढ झाली होती ज्यात गेल्या वर्षीच्या ५५८.१२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत ७५८ कोटींचा महसूल कंपनीला प्राप्त झाला.
ईबीटा (EBITDA) मार्जिनमध्येही कंंपनीने अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ईबीटा (करपूर्व कमाई) ६८% वाढत १८४ कोटींवर पोहोचली आहे. बाजारातील माहितीनुसार, गेल्या ५ वर्षात कंपनीने भागभांडवलधारकांना (Shareholder) ३७०% परतावा (Returns) दिले आहेत. गेल्या वर्षभरात कंपनीने २३% हून अधिक परतवा दिला असून उपलब्ध माहितीनुसार, शेवटचा इंट्राडे उच्चांक १७ जून २०२५ ला गाठला होता ज्यात शेअर ५२ आठवड्यातील सर्वाधिक १२५५ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत होता.
उपलब्ध माहितीनुसार गेल्या पाच बाजार सत्रात कंपनीने शेअर १०% अधिक पातळीवर उसळला आहे. तिमाहीतील निकालानुसार शेअरचा वायटीडी (Year to Date) १६.९८% प्रति शेअर आहे. सध्या, इंटेलेक्ट डिझाइन अरेना त्याच्या ५-दिवस, २०-दिवस, ५०-दिवस, १००-दिवस आणि २००-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त व्यवहार करत आहे, जे त्याच्या ऐतिहासिक किंमत ट्रेंडच्या तुलनेत मजबूत कामगिरी दर्शवते. आज स्टॉकची अस्थिरता लक्षणीय आहे, ५९.६२% च्या इंट्राडे अस्थिरतेसह सक्रिय व्यापार परिस्थितीत (Active Trading Position) शेअर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
कंपनी प्रामुख्याने आयटी क्षेत्रात कार्यरत आहे प्रामुख्याने कंपनी फिनटेक (Financial Technology) बाजारात आणते. डिजिटल बँकिग, पेमेंट व्यवहार, लेडिंग, कोर बँकिग सोल्यूशन आणि तत्सम उत्पादनात कंपनी सक्रिय आहे.






