कोल्हापूर : समितीचे श्री शाहू मार्केट यार्डमधील जावेद इब्राहिमभाई बागवान यांच्या जे बी अँड सन्स फळ विभाग गाळा नंबर ६ या दुकानात शेतकरी प्रकाश शिरसेकर देवगड यांच्या देवगड हापूस आंब्याची आवक झाली. त्यामध्ये एक डझनाचे ५ बॉक्स होते. त्याचा सौदा समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आला.
सदर सौद्यामध्ये १ डझनच्या आंबा बॉक्सचा दर ४२०० रुपये असा झाला असून सदरचा आंबा बॉक्स फळ व्यापारी आफान बागवान यांनी सौद्यामध्ये खरेदी केला. सदर सौद्याप्रसंगी उपस्थित मान्यवर उपसभापती राजाराम चव्हाण, संचालक सुयोग वाडकर, बी. जी. पाटील. पांडूरंग काशिद, नानासो कांबळे. दिलीप पोवार, समिती सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, फळे व भाजीपाला विभाग प्रमुख अनिल पाटील, ॲड. सुहेल बागवान, सलीमभाई बागवान, इरफान बागवान, शौकतभाई बागवान फळे असोसिशनचे अध्यक्ष नईम बागवान, शेतकरी, अडते. व्यापारी, समिती अधिकारी व कर्मचारी वर्ग व इतर घटक उपस्थित होते






