मोहित सोमण:दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोन्याने आज पुन्हा एकदा वेग धरला आहे. आज सोने जागतिक अस्थिरतेच्या निमित्ताने पुन्हा एकदा महागले असून एकाच दिवसात सोन्याने मोठी रॅली सोमवारी संध्याकाळपर्यंत मिळवली आहे. तर चांदीच्या दरातही सलग दुसऱ्यांदा मोठी वाढ अनिश्चिततेमुळे झाली आहे. सोन्याच्या बाबतीत दोन दिवस स्थिरतेमुळे सोन्याच्या मागणीत झालेल्या घसरणीमुळे दर स्वस्त झाले होते. मात्र पुन्हा एकदा तिसऱ्यांदा युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीची अनिश्चितता, संभाव्य चीन युएस व्यापारी करार, चीनच्या उत्पादकतेत झालेली घसरण. तसेच चीनकडून सोन्याच्या किरकोळ व्यापाऱ्यांवरून उठलेली सोन्याच्या करावरील १३% सवलत या विविध कारणांमुळे आज सोने पुन्हा एकदा महागले आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १७ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १३ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १२३१७ रूपयांवर, २२ कॅरेटसाठी ११२९० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ९२३८ रूपयांवर पोहोचले आहेत.
प्रति तोळा किंमतीबाबत, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत १७० रूपयांनी, २२ कॅरेटसाठी १५० रुपयांनी, व १८ कॅरेटसाठी १३० रुपयांनी वाढ झाली. परिणामी सोन्याचे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १२३१७० रुपयांवर, २२ कॅरेटसाठी ११२९०० रूपयांवर, १८ कॅरेटसाठी ९२३८० रूपयांवर पोहोचली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १२३८२, २२ कॅरेटसाठी ११३५०, १८ कॅरेटसाठी ९४७५ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली असताना कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या संध्याकाळपर्यंत ०.१९% वाढ झाली आहे.
चांदीच्या बाबतीतही मोठी वाढ आज नोंदवली गेली. सलग दुसऱ्यांदा चांदीत वाढ झाली आहे. युएस मधील फेड दरातील वाढलेली अस्थिरता, वाढलेली औद्योगिक मागणी, ईटीएफ गुंतवणूकीत झालेली वाढ, सुरक्षित किफायतशीर गुंतवणूक पर्याय या एकत्रित कारणांमुळे आज चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात २ रूपयांनी, तर प्रति किलो दरात २००० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदी १५४ रुपयांवर व प्रति किलो चांदी १५४००० रूपयांवर पोहोचले आहे. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर १६८० रुपये असून प्रति किलो दर १६८००० रूपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्स कमोडिटी बाजारातील चांदीच्या निर्देशांकातही संध्याकाळपर्यंत ०.३६% वाढ झाल्याने दरपातळी १४८८२२ रूपयांवर पोहोचली आहे.






