Sunday, November 2, 2025
Happy Diwali

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी पावसाचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवस फक्त राज्यातच नाही तर देशातील अनेक भागात पाऊस असण्याचे संकेत आहेत. ज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा, पश्चिम बंगाल, सिक्किम,बिहार या भागात जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अंदमान निकोबार येथेही अतिमुसळधार पाऊस होणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसतोय. आज सकाळीसुद्धा अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झाल्याचे दिसले. नोव्हेंबर महिन्याला सुरूवात झाली असून पाऊस अजूनही सुरू असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात शेती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहे. दिसतंय. पावसामुळे शेतींचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मोंथा चक्रीवादळ शांत झाले असूनही देशातील विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात कुठे पडणार मुसळधार पाऊस ?

पुढील २४ तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. नंदूरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानंतर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा