Sunday, November 2, 2025
Happy Diwali

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने ५८ चेंडूत आठ चौकार मारत ४५ धावा केल्या. ती क्लो ट्रायॉनच्या चेंडूवर सिनालो जाफ्ताकडे झेल देऊन परतली. पण बाद होण्याआधी स्मृती मंधानाने एक ऐतिहासिक कामगिरी केली. स्मृतीने एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. तिने मिताली राजचा विक्रम मोडीत काढला.

स्मृतीने आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ मध्ये ४३४ धावा केल्या. ही कामगिरी करुन स्मृतीने मिताली राजचा २०१७ चा एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा कराऱ्या भारतीय खेळाडूचा विक्रम मोडला. मितालीने २०१७ च्या महिला वर्ल्डकपमध्ये ४०९ धावा केल्या होत्या. आता एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत स्मृती मंधाना पहिल्या आणि मिताली राज दुसऱ्या स्थानी आहे.

एका महिला वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांची यादी

  1. स्मृती मंधाना - ४३४ धावा, २०२५
  2. मिताली राज - ४०९ धावा, २०१७
  3. पूनम राऊत - ३८१ धावा, २०१७
  4. हरमनप्रीत कौर - ३५९ धावा, २०१७
  5. स्मृती मंधाना - ३२७ धावा, २०२२
Comments
Add Comment