मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात तिहेरी मार्गिका असलेल्या जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी प्राथमिक खोदकाम लवकरच सुरू आहे. गोरेगाव-मुलुंड हा जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित असून प्रकल्पाची कामे निर्धारित कालमर्यादेतच पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
भूमिगत जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी दोन अत्याधुनिक बोगदा खनन संयंत्रे आवश्यक आहेत. यापैकी एका बोगदा खनन संयंत्राचे सर्व घटक भाग गोरेगावच्या जोश मैदान या ठिकाणी पोहोचले आहेत. हे सुटे भाग जपानहून एकूण ७७ कंटेनरमधून आयात करण्यात आले आहेत. दुसऱ्या संयंत्राचे घटक भाग डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यस्थळी पोहोचण्याची अपेक्षा आहे. बोगदा खनन संयंत्राच्या भागांची जोडणी ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर, दुसऱ्या बोगदा खनन संयंत्राच्या भागांची जोडणी ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर बोगद्याच्या खोदकामास प्रत्यक्षात सुरुवात होईल.
नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियममध्ये आज म्हणजेच रविवार २ नोव्हेंबर २०२५ ...
तिहेरी मार्गिका असलेल्या पेटी बोगद्याचे काम अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक स्वरूपाचे आहे. बोगदा खनन संयंत्रांच्या सहाय्याने एकूण सुमारे ५.३ किलोमीटर लांबीपर्यंत दुहेरी बोगद्यांचे खोदकाम करण्यात येणार आहे. पेटी बोगद्यासह हे एकूण अंतर सुमारे ६.६२ किलोमीटरपर्यंत वाढेल. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास सुमारे १४.४२ मीटर इतका असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे आतापर्यंतचे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वांत मोठे बोगदे ठरतील.
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषत: दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन जोडमार्ग स्थापित होणार आहे. पश्चिमेकडील मुंबई किनारी रस्ता ते मालाड माईंडस्पेस आणि थेट ऐरोलीला हा मार्ग जोडला जाणार आहे.





