टी-२० वर्ल्डकप तोंडावर असताना केन विल्यमसनचा निवृत्तीचा निर्णय, न्यूझीलंडला मोठा धक्का

मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०२६ जवळ येत असतानाच न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन (३५) याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंका संयुक्तरित्या टी-२० वर्ल्डकप २०२६ चे आयोजन करणार आहेत. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी विल्यमसनने घेतलेला निर्णय न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


विल्यमसनने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळत २५७५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी ३३ इतकी आहे. तो न्यूझीलंडच्या वतीने सर्वाधिक धावा करणारा टी-२० खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर १८ अर्धशतक आणि ९५ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-२० क्रिकेटध्ये २०११ मध्ये पदार्पण करणाऱ्या विल्यमसनने ७५ सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वात संघाने दोनदा टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी (२०१६, २०२२) आणि एकदा अंतिम फेरी (२०२१) गाठली होती.


विल्यमसनने सांगितले की, “हा फॉरमॅट सोडण्याची ही योग्य वेळ आहे. आता पुढील पिढीतील खेळाडूंना जागा देणं आणि त्यांना मोठ्या स्पर्धांसाठी तयार करणं गरजेचं आहे.” त्याने पुढे डेरील मिचेलचे कौतुक करत सांगितले की, “तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे.”


विल्यमसन आता डिसेंबरमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रीत करणार आहे. तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मेहनत घेणार आहे.

Comments
Add Comment

आयपीएल २०२६ : हर्षित राणा दुखपातीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. हर्षित राणा आयपीएलमधून बाहेर पडला

सीएसकेविरोधात सन टीव्ही नेटवर्कची मद्रास उच्च न्यायालयात धाव

रजनीकांत यांच्या गाण्यांचा आणि संवादांचा अनधिकृत वापर केल्याचा दावा नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आरसीबीचा 'स्टार' गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर?

जोश हेझलवूड ‘अॅशेस’ मालिकेलाही मुकला होता बंगळूरु : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला २८ मार्चपासून सुरुवात होत

Team India Schedule : विश्वचषकाच्या विजयानंतर पुढील कामगिरीसाठी भारतीय संघ सज्ज

- जाणून घ्या भारतीय संघाचे नवीन व्यस्त वेळापत्रक २०२६ चा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने जागतिक

ICC Men's T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकामुळे आयसीसीची कोट्यवधींची कमाई

मुंबई : ICC Men's T20 World Cup २०२६ स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही मोठी ठरली आहे. या स्पर्धेतून

मॅच फिक्सिंग प्रकरणात ICC ची मोठी कारवाई; वेस्ट इंडिजचा खेळाडू आणि दोन संघ अधिकाऱ्यांवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मॅच फिक्सिंग आणि गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी कठोर कारवाई करत वेस्ट इंडिजचा