भारताची फटकेबाजी, द. आफ्रिकेला दिले मोठे आव्हान

नवी मुंबई : महिला वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत सात बाद २९८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेपुढे ५० षटकांत २९९ धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे. 


भारताकडून स्मृती मंधानाने ४५ धावा, शफाली वर्माने ८७ धावा, जेमिमा रॉड्रिग्जने २४ धावा, हरमनप्रीत कौरने २० धावा, दीप्ती शर्माने ५८ धावा, अमनजोत कौरने १२ धावा, रिचा घोषने ३४ धावा, राधा यादवने नाबाद ३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अयाबोंगा खाकाने ३ तर नॉनकुलुलेको म्लाबा, नॅडिन डी क्लार्क आणि क्लो ट्रायॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५



यंदाच्या फायनलचा विजेता हा पहिल्यांदाच महिला क्रिकेट वर्ल्डकपवर स्वतःचे नाव कोरणार आहे. यामुळे या ऐतिहासिक सामन्याचे महत्त्व वाढले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी २०१७ आणि २००५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामुळे यावेळी तरी भारत विश्वविजेता होईल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे अंतिम सामना झाला. हा सामना इंग्लंडने नऊ धावांनी जिंकला होता. याआधी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर अंतिम सामना झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९८ धावांनी जिंकला होता. या दोन्ही सामन्यांत भारत उपविजेता झाला होता. यामुळे आता तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ यावेळी तरी विश्वविजेता होतो का याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.









Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला