Sunday, November 2, 2025
Happy Diwali

ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका

ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका

नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियममध्ये आज म्हणजेच रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमनेसामने असेल. या सामन्याचा विजेता पहिल्यांदाच महिला क्रिकेट वर्ल्डकपवर स्वतःचे नाव कोरणार आहे. यामुळे या ऐतिहासिक सामन्याचे महत्त्व वाढले आहे.

भारतीय महिला क्रिकेट तिसऱ्यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी २०१७ आणि २००५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यामुळे यावेळी तरी भारत विश्वविजेता होईल अशी आशा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये लॉर्ड्स येथे अंतिम सामना झाला. हा सामना इंग्लंडने नऊ धावांनी जिंकला होता. याआधी २००५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर अंतिम सामना झाला होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने ९८ धावांनी जिंकला होता. या दोन्ही सामन्यांत भारत उपविजेता झाला होता. यामुळे आता तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात खेळत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ यावेळी तरी विश्वविजेता होतो का याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

भारताकडे स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर हे दोन अनुभवी खेळाडू आणि जागतिक दर्जाचे फिरकीपटू आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडे लॉरा वॉल्वार्डट आणि मॅरिझॅन कॅप सारखे उत्तम फलंदाज आहेत. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी खूप चांगली आहे.

भारताच्या तुलनेत उत्तम कामगिरीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे सातत्य दिसून येत. भारत क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत तर ऑस्ट्रेलिया फिरकी मारा करण्याच्या बाबतीत कमकुवत आहे. यामुळे अंतिम सामन्याविषयी उत्सुकता वाढू लागली आहे.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, उमा छेत्री

ऑस्ट्रेलिया : लॉरा वॉल्वार्डट (कर्णधार), सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), तझमीन ब्रिटिश्स, अँनेके बॉश, सुन लुस, मॅरिझॅन कॅप, अँनेरी डर्कसेन, क्लो ट्रायॉन, नॅडिन डी क्लार्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा, मसाबाटा क्लास, तुमी सेखुखुने, नोंडुमिसो शांगसे, कराबो मेसो

अंतिम सामन्याचे वेळापत्रक

दिनांक : रविवार, २ नोव्हेंबर

स्थळ : डी. वाय. पाटील स्टेडियम (D. Y. Patil Stadium), नवी मुंबई

सामन्याची वेळ : दुपारी ३:०० वाजता (भारतीय वेळेनुसार) टॉस दुपारी २:३० वाजता

स्टेडियममध्ये प्रेक्षकांची गर्दी होणे अपेक्षित आहे, कारण याच मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत विक्रमी विजय मिळवला होता. भारतीय महिला संघ (Team India) तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) हा पहिलाच वर्ल्ड कप फायनल आहे. त्यामुळे, दोन्ही संघांना पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी (Golden Opportunity) मिळाली आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत.

सामना लाईव्ह कुठे पाहाल ?

हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित (Live Telecast) केला जाईल. याव्यतिरिक्त, चाहते हा सामना जिओ सिनेमा (Jio Cinema) आणि हॉटस्टार (Hotstar) ॲपवर 'मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग' (Free Live Streaming) द्वारे पाहू शकतील.

हवामानाचा अंदाज : रविवार २ नोव्हेंबर रोजी पहाटे चार ते सात आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेत पावसाची शक्यता

पावसाचा सामन्यावर काय परिणाम होऊ शकतो ?

सामना सुरू असताना पावसाचा व्यत्यय आला तर सामन्याची षटके (ओव्हर्स) कमी केली जाऊ शकतात. पण पावसाचा व्यत्यय दीर्घ काळ आला तर महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना (फायनल मॅच) राखीव दिवशी म्हणजेच सोमवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता डी. वाय. पाटील स्टेडियममध्येच खेळवला जाऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा