Sunday, November 2, 2025
Happy Diwali

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात न्यायालयाने निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घ्याव्या असे आदेश दिले आहेत. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आसपास निवडणुकांचे बिगूल वाजणार असल्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोणत्याही अधिकृत तारखा जाहीर केल्या नसल्या तरी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मागील पाच वर्षांपासून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. ५ किंवा ६ नोव्हेंबरला निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. यानंतर लगेच आचारसंहिता लागणार आहे.

तीन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा