Sunday, November 2, 2025
Happy Diwali

होबार्टमध्ये चमकला ऑस्ट्रेलियाचा विक्रमवीर फलंदाज टीम डेव्हिड

होबार्टमध्ये चमकला ऑस्ट्रेलियाचा विक्रमवीर फलंदाज टीम डेव्हिड

होबार्ट : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-२० सामना होबार्ट येथे रंगला असून, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज टीम डेव्हिडने इतिहास रचला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १००० धावा पूर्ण केल्या. याआधी हा मान भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवकडे होता. सूर्यकुमारने ५७३ चेंडूत १००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर टीम डेव्हिडने फक्त ५६९ चेंडूत हा टप्पा गाठत त्याला मागे टाकले.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने १००० धावा करणारे खेळाडू:

५६९ चेंडू – टीम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया) ५७३ चेंडू – सूर्यकुमार यादव (भारत) ६०४ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) ६११ चेंडू – फिन एलन (न्यूझीलंड)

याशिवाय, टीम डेव्हिड एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत ट्रेविस हेडचा विक्रम मोडला आहे. हेडने २०२४ मध्ये ३३ षटकार लगावले होते, तर सध्याच्या सामन्यानंतर डेव्हिडच्या खात्यात एकूण ३५ षटकार झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाकडून एक वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:

३५ – टीम डेव्हिड (२०२५) ३३ – ट्रेविस हेड (२०२४) ३१ – अॅरॉन फिंच (२०१८) २९ – मिच मार्श (२०२५)

Comments
Add Comment