नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आता 'आप'चे (AAP) संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी चंदीगडमध्ये 'शीशमहल' (Sheesh Mahal) बांधल्याचा नवा आरोप केला आहे. भाजपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर एक फोटो पोस्ट करून हा आरोप केला आहे. आम आदमी पार्टीने (AAP) भाजपचे हे आरोप फेटाळले आहेत. तसेच पुरावे सादर करा अशी मागणी भाजपकडे केली आहे. यामुळे चंदिगडमध्ये भाजप आणि आप यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई : महिला विश्वचषक २०२५ (ICC Women's World Cup 2025) चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना ...
भाजपचा अरविंद केजरीवाल यांच्यावर २ एकरच्या आलिशान कोठीवरून गंभीर आरोप
‼️ Big Breaking - आम आदमी का ढोंग करने वाले केजरीवाल ने तैयार करवाया एक और भव्य शीशमहल
दिल्ली का शीश महल ख़ाली होने के बाद पंजाब के Super CM अरविंद केजरीवाल जी ने पंजाब में दिल्ली से भी शानदार शीश महल तैयार करवा लिया है 😳 चंडीगढ़ के सेक्टर 2 में CM कोटे की 2 Acre की आलीशान 7… pic.twitter.com/d3V4W23yRw — BJP Delhi (@BJP4Delhi) October 31, 2025
भाजपने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "दिल्लीचा शीशमहल रिकामा झाल्यानंतर, पंजाबचे 'सुपर सीएम' अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये दिल्लीपेक्षाही शानदार 'शीश महल' (Sheesh Mahal) तयार करवून घेतला आहे." भाजपच्या दाव्यानुसार, "चंदीगडच्या सेक्टर-२ मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून २ एकरची आलिशान आणि ७ स्टार सरकारी कोठी अरविंद केजरीवाल यांना मिळाली आहे."
'आप'चा भाजपवर पलटवार; 'शीशमहल'चा दावा खोटा
जब से प्रधानमंत्री की फर्जी यमुना की कहानी पकड़ी गयी है बीजेपी बौखला सी गयी है।
और बौखलाहट में बीजेपी आजकल सबकुछ फ़र्ज़ी कर रही है। फ़र्ज़ी यमुना, फ़र्ज़ी प्रदूषण के आंकडे, फर्जी बारिश के दावे, और अब फ़र्ज़ी 7 स्टार दावा। बीजेपी का फ़र्ज़ी दावा है कि चंडीगढ़ में 7 स्टार घर… https://t.co/ZlGsIYwtNr — Aam Aadmi Party Delhi (@AAPDelhi) October 31, 2025
आम आदमी पार्टीने भाजपच्या या दाव्याला फेटाळले आहे. केजरीवाल यांच्या घराविषयी भाजपच्या आरोपांत तथ्य नाही, असे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. भाजप वाटेल ते आरोप करत आहे, असाही दावा आम आदमी पार्टीने केला. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता असली तरी चंदिगड या केंद्रशासित भागात भाजपचीच सत्ता आहे. यामुळे आरोप करताना भाजपने पुरावे सादर करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. 'आप'चे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनुराग ढांडा यांनी भाजपवर थेट हल्लाबोल करत अनेक प्रश्न विचारले, "चंदीगडमध्ये भाजपचे प्रशासन आहे, तर सवाल हा आहे की, नकाशा (Map) कोणी पास केला ? वीज कनेक्शन (Electricity Connection) कोणी दिले ?, पाणी कनेक्शन (Water Connection) कोणी दिले ?, पोलिसांनी ते बनू कसे दिले? ...आणि ते घर पडणार कधी आहात?" या पलटवाराने चंदीगडच्या कथित 'शीशमहल' प्रकरणावर राजकारण अधिक तापले आहे.
शहजाद पूनावाला यांचा केजरीवाल यांच्यावर '७ स्टार शीशमहल'चा आरोप
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पूनावाला (Shehzad Poonawalla) यांनी 'आप'चे (AAP) संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. पूनावाला यांनी आरोप केला की, केजरीवाल यांना पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या कोट्यातून '७ स्टार सुविधा असलेला शीश महल' दिला जात आहे. केजरीवाल हे निवडलेले आमदार नाहीत आणि राज्य सरकारचा भागही नाहीत, तरीही त्यांना ही सुविधा दिली जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. याव्यतिरिक्त, पूनावाला यांनी असाही आरोप केला की, दिल्लीमध्ये निवडणूक हरलेल्या 'आप' नेत्यांना पंजाबमधील विविध बोर्ड आणि आयोगांमध्ये 'पद' दिले जात आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
स्वाती मालीवाल यांचा केजरीवाल यांच्यावर गंभीर निशाणा
दिल्ली का शीश महल ख़ाली होने के बाद अरविंद केजरीवाल जी ने पंजाब में दिल्ली से भी शानदार शीश महल तैयार करवा लिया है। चंडीगढ़ के सेक्टर 2 में CM कोटे की 2 Acre की आलीशान 7 स्टार सरकारी कोठी अरविंद केजरीवाल जी को मिल गई है। कल अंबाला के लिए घर के सामने से सरकारी हेलीकॉप्टर में… pic.twitter.com/Vy1MfMGkt1
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) October 31, 2025
'आप'च्या (AAP) अंतर्गत वादातून बाहेर पडलेल्या राज्यसभा खासदार आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनीही अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कथित 'शीशमहल' वादावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मालीवाल यांनी 'एक्स' (X) सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर दावे केले, "दिल्लीचा शीश महल खाली झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आता पंजाबमध्ये दिल्लीपेक्षाही शानदार 'शीश महल' तयार करवून घेतला आहे." त्यांनी पुढे दावा केला की, केजरीवाल आता सरकारी हेलिकॉप्टर (Government Helicopter) आणि प्रायव्हेट जेटचा (Private Jet) वापर करत आहेत. मालीवाल यांनी 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले, "ते अंबालासाठी घराच्या समोरून सरकारी हेलिकॉप्टरमध्ये बसले, आणि त्यानंतर अंबालाहून पंजाब सरकारचे प्रायव्हेट जेट त्यांना पार्टीच्या कामासाठी गुजरातला घेऊन गेले... संपूर्ण पंजाब सरकार एका माणसाच्या सेवेत आहे." या वक्तव्यांमुळे 'आप'मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.






